Take a fresh look at your lifestyle.

म्हणून योगीराज्यातून मोदींचा चेहराच गायब; सोशल मिडियासह यापुढे सगळीकडे दिसणार फ़क़्त ‘असेच’

दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या ट्विटर खाते आणि इतर पोस्टरवरुन काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो गायब झालेले आहेत. यासह आता यापुढे या राज्यात होणाऱ्या सर्वच निवडणुकीच्या प्रचार धोरणातून मोदी गायब होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी आरएसएसने भाजपच्या यशासाठी एक ब्लू प्रिंट तयार करून आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात लढवण्याचा निर्णय घेतल्याने असे झालेले आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदी विधानसभा निवडणुकीत प्रमुख चेहरा म्हणून दिसणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. एकूणच योगी यांना राजकीयदृष्ट्या आणखी प्रस्थपित करण्याचासाठी पक्ष आणि पक्षाची मातृसंस्था असलेल्या आरएसएसने हे नियोजन पक्के केले आहे. राज्यांच्या निवडणुकीत मोदींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसल्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ पक्ष आणि आरएसएसवर आलेली आहे. पंतप्रधान मोदींचा चेहरा प्रादेशिक नेत्यांसमोर ठेवल्याने त्यांची प्रतिमा खराब झाल्याचे अनेक नेत्यांना वाटल्याने हा महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे.

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ममता विरुद्ध मोदींच्या रणनीतीमुळे भाजपला नुकसान झाल्याचे वाटल्याने या बदलास सुरुवात झालेली आहे. दिल्लीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबोले यांच्या उपस्थिती झालेल्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे. 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्याविरोधात आणि नंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्याविरूद्ध या रणनीतीचा फायदा झाला नसल्याचे या नेत्यांना वाटत आहे.

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनजी आणि काँग्रेसने मोदी यांना मुस्लिमविरोधी असल्याचे टॅगिंग केले. उत्तर प्रदेश राज्यात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने इथेही असेच होईल असे पक्षाला आता वाटत आहे. योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा मुस्लिमविरोधी नाही. मुख्यमंत्री होण्यापूर्वी गोरखपूर येथील मंदिराचे महंत असलेल्या योगी यांच्याकडे मंदिरात स्थानिक मुस्लिमांचे काहीही वाद मिटवले जात. मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरात होणारी खिचडी जत्रेतील बहुतांश दुकाने मुस्लिम व्यावसायिकांची असल्याने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्णय आरएसएसने घेतला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply