Take a fresh look at your lifestyle.

Udhav Thackeray PM Modi Meet : बैठक संपली; पत्रकार परिषद चालू, ‘त्या’ मुद्यांवर झाली चर्चा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह  उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे. बैठकीतील चर्चेचा तपशील अजूनही समोर आलेला नाही. मात्र, भेटीत मराठा आरक्षणासह लसीचा अपुरा पुरवठा, जीएसटीचा थकीत परतावा व कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा रखडलेला प्रकल्प आदींवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठक जवळपास पावणे दोन तास चालली. मुख्यमंत्र्यांसह इतर नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरुन बाहेर पडले आहेत. महाराष्ट्र सदन येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पंतप्रधान मोदींची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट घेतली आहे. त्यामुळे आता या भेटीत काय झाले, कशावर चर्चा झाली, याची उत्सुकता देशाला लागली आहे.

Advertisement

बैठकीतील मुद्दे असे :

Advertisement
 • मराठा आरक्षण
 • इतर मागासवर्ग आरक्षण
 • मागासवर्गीय बढतीमधील आरक्षण
 • चौथा मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गच्या जागेचा मुद्दा
 • जीएसटी
 • पीककर्ज, पीकविमा : महाराष्ट्रात बीड पॅटर्नची माहिती
 • मुंबईमध्ये व गेली काही वर्षे महाराष्ट्रात किनारपट्टीच्या भागात चक्रीवादळाचे नुकसान
 • मदतीचे निकष जुने झाले आहेत, ते बदलणे
 • NDRF चे निकष बदलणे आवश्यक
 • चौदाव्या वित्त आयोगातील थकीत निधी
 • मराठा भाषेला अभिजात दर्जा मिळावा

(CM Udhav Thackeray Meet PM Narendra Modi In Delhi Live Updates)

Advertisement
 • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
 • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply