Take a fresh look at your lifestyle.

म्हणून नवनीत राणा यांची खासदारकी येणार धोक्यात? पहा नेमके काय झालेय प्रकरण

नागपूर : युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे जात प्रमाणपत्र  हायकोर्टाने रद्द केले आहे. खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे विदर्भात खळबळ उडाली आहे.

Advertisement

राणा या 2019 साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येताना त्यांनी शिवसेनेच्या हेविवेट नेत्यांपैकी एक असलेल्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून महाराष्ट्राला धक्का दिला होता. डसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केल्यानुसार मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने त्यावर निकाल दिला आहे. खासदार राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे दोघेही सध्या दिल्लीमध्ये आहेत. राणा यांना सुप्रीम कोर्टाचा पर्याय आहे.

Advertisement

निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रमाणप्रत्र किंवा प्रतिज्ञापत्र खोटे ठरल्यास पद रद्द होते. त्याच नियमाने राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या नवनीत राणा या या मॉडेलिंगमध्ये होत्या. 2011 साली रवी राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेऊन राजकारणात प्रवेश केला. रवी राणा हे त्यावेळी अमरावतीच्या बाडनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. 2019 च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा 36000 मतांनी पराभव करून त्यांनी अनेकांना धक्का दिला होता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply