Take a fresh look at your lifestyle.

नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देण्यासाठी मोदी सरकार करणार हजारो कोटी खर्च; पहा कुठून येणार त्यासाठी पैसे

दिल्ली : देशातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण आणि देशभरातील जवळपास ८० कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या दोन्ही योजनांसाठी खर्च तर केंद्र सरकारलाच करावा लागणार आहे. पण, किती खर्च करावा लागणार, यासाठी पैशांचे काय, असे प्रश्न पडला असेल ना. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मिळाले आहे. चला तर मग, या दोन्ही योजनांसाठी केंद्र सरकारला नेमका किती खर्च करावा लागेल, याची माहिती घेऊ.

Advertisement

देशात आजमितीस १८ वर्षांवरील वयोगटातील सुमारे ९४ कोटी नागरिक आहेत. या सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करायचे आहे. केंद्र सरकारने नियोजन सुरू केले असून पहिल्या टप्प्यात ४४ कोटी लसींची ऑर्डर लस कंपन्यांना दिली असल्याची माहिती आहे. या संपूर्ण लसीकरणासाठी केंद्र सरकारला सुमारे १० हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे. मे आणि जून या दोन महिन्यात देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचे सरकारचे नियोजन होते. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहता या योजनेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता नोव्हेंबरपर्यंत लोकांना मोफत धान्य मिळणार आहे. पाच महिने मुदतवाढ दिली म्हटल्यावर अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. यासाठी केंद्र सरकारला तब्बल ८० हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, असे सांगण्यात आले.

Advertisement

या योजनांसाठी सरकारचे पैशांचे नियोजन करायचे म्हटले तर जास्त त्रास घ्यावा लागणार नाही. कारण, आरबीआयने केंद्र सरकारला ९९ हजार १२० कोटी रुपयांचा निधी दिला आहेच. या व्यतिरिक्त लसीकरणासाठी बजेटमध्ये सुद्धा ३५ हजार कोटी रुपये तरतूद केली आहेच. तसेच केंद्र सरकार संपत्ती विक्रीतून सुद्धा पैसे मिळणे अपेक्षित आहे. केंद्र सरकार इतका खर्च करणार म्हटल्यानंतर सरकारचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहेच. या व्यतिरिक्त सरकारने आणखी काही कल्याणकारी योजनांची घोषणा केली आहे. तेथेही खर्च करावा लागणार आहे. या सर्वांचे नियोजन आता केंद्र सरकारला करावे लागणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारने लसीकरणाच्या नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. त्यानुसार लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून केंद्र सरकार ७५ टक्के लसी खरेदी करुन राज्यांना मोफत देणार आहे. लसीकरणाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. २१ जूनपासून लसीकरणास सुरुवात होणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply