Take a fresh look at your lifestyle.

‘गुगल’कडून छोट्या कंपन्यांवर अन्याय, नियमभंग केल्याने फ्रान्सने ठोठावला दंड.. पाहा नेमकं काय प्रकरण आहे..?

आयटी क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे, गूगल. सध्याच्या आधुनिक जगात ‘गुगल’शिवाय जगणं कठीण आहे. जगातील सर्वात जास्त डाटा ‘गूगल’कडे (Google) आहे. त्यामुळेच या कंपनीच जगभर एकतर्फी वर्चस्व निर्माण झालं आहे. त्या आधारे ऑनलाईन जाहिरातींच्या (Online Advertisement) बाजारपेठेत नियम डावलून ‘गुगल’ सुसाट सुटले आहे. मात्र, त्याला फ्रान्सने (France) लगाम घालण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

मागील काही वर्षांपासून युरोपमध्ये अमेरिकन आयटी कंपन्यांचं वर्चस्व वाढत आहेत. त्यामुळे युरोपातील अन्य लघु-मध्यम स्वरुपाच्या कंपन्यांवर दबाव निर्माण झाला आहे. अशा काळात बाजारपेठेत प्रबळ स्थानाचा गैरवापर केल्याच्या कारणावरून फ्रान्सच्या मार्केट नियामकाने ‘गूगल’वर 22 कोटी यूरो, अर्थातच 1953 कोटी रुपयांचा दंड केला आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशनने (Market competition) ठोठावलेल्या या दंडाविरोधात ‘गूगल’ने अद्याप आव्हान दिलेले नाही. याउलट बदल प्रस्तावित केले आहेत. ‘गूगल’च्या जाहिरातीच्या पद्धत भयानक आहे. बाजारातील प्रतिस्पर्धी, मोबाइल साइट्सचे प्रकाशक आणि अनुप्रयोग युनिट्सवर ‘गुगल’ दंडात्मक कारवाई करीत आहे. छोट्या-मोठ्या कंपन्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होणार नाही, ही बलाढ्य कंपनीची एक जबाबदारी असते; पण विविध पद्धती वापरुन ‘गुगल’ प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध अन्यायकारक स्पर्धा करीत असल्याचे फ्रान्सच्या मार्केट कॉम्पिटीशन रेग्युलेटरने निवेदनात म्हटलं आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply