Take a fresh look at your lifestyle.

लावा की झाडे.. फ़क़्त १० रुपयांना मिळतेय रोपटे; पहा कसा घ्यायचा योजनेचा लाभ

नाशिक : जागतिक तापमानवाढ ही एक महत्वाची डोकेदुखी बनली आहे. त्यावर मात करण्यासाठी पर्यावरण संवर्धन हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे ही एक लोकचळवळ जगभरात पुढे येण्याची गरज आहे. या लोकचळवळीला गती मिळत नसल्याने सरकारी पातळीवरून प्रतिवर्षी रोपांची लागवड करण्यासाठी खास स्कीम राबवण्यात येतात.

Advertisement

यंदाही राज्यात १५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत वन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून त्यासाठी वन विभागातर्फे जनतेला सवलतीच्या दरात रोपे पुरवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत खासगी मालकीचे पडीत क्षेत्र आणि शेताच्या बांधावर, रेल्वे दुतर्फा, कालवा दुतर्फा तसेच रस्ता दुतर्फा क्षेत्रात, सामूहिक पडीत क्षेत्र व गायरान क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवण्याचे नियोजन आहे.

Advertisement
या योजनेचे महत्वाचे मुद्दे असे :
सर्वसाधारण कालावधीत ९ महिन्यांचे रोप (लहान पिशवीतील रोप ) २१ रुपयांना तर १८ महिन्याचे रोप (मोठ्या पिशवीतील रोप) हे ७३ रुपयांना एक याप्रमाणे मिळते
वनमहोत्सवाच्या काळात ९ महिन्यांचे रोप केवळ १० रुपयांना तर १८ महिन्यांचे मोठ्या पिशवीतील रोप ४० रुपयांना एक याप्रमाणे मिळणार आहे
शासकीय यंत्रणांना वृक्ष लागवड करावयाची आहे, अशा यंत्रणांना रोप निर्मितीसाठी कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्यास त्यांना रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येईल
नजीकचे उपवनसंरक्षक किंवा विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांच्याकडे पत्र देऊन नोंदणी केल्यावर रोपे मिळतील
सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, निसर्गप्रेमी यांनी घेऊन वनेतर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हरित महाराष्ट्र घडवण्यासाठी आपले योगदान देण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply