Take a fresh look at your lifestyle.

रेशनकार्ड नसले तरी मिळणार मोफत गहू नि तांदूळ, पाहा कसे मिळवायचे हे धान्य..?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोनाविरुद्धची लढाई लढताना देशवासीयांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून दिवाळीपर्यंत मोफत रेशन देणार असल्याचे जाहीर केले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, या वेळी गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांनाही मोफत धान्य मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना फक्त आधारकार्डद्वारे नोंदणी करावी लागेल. त्यानंतर त्यांना मोफत प्रत्येकी 5 किलो गहू व तांदूळ दिले जाणार आहे.

Advertisement

कोरोना संकटात कोणीही उपाशीपोटी झोपू नये, यासाठी मोदी सरकारने (Modi sarkar) पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली. त्याद्वारे सरकारतर्फे गरीब कामगारांना मोफत रेशन देण्यात येते. पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केल्यावर अन्न मंत्रालयाने जाहीर केले, की एखाद्याकडे रेशनकार्ड नसेल, तर त्याने आधारकार्डद्वारे नोंदणी करावी. त्यानंतर त्यास एक स्लिप देण्यात येईल. ती स्लिप दाखवल्यानंतर त्यास मोफत धान्य मिळेल. त्यासाठी राज्य सरकारांचीही जबाबदारी निश्चित करण्यात आलीय.

Advertisement

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मिळणारे 5 किलो मोफत धान्य रेशनकार्डवर मिळणाऱ्या धान्याच्या कोट्याव्यतिरिक्त असेल. म्हणजेच, तुम्हाला रेशनकार्डवर (Ration card) धान्य मिळाले असले, तरी 5 किलो अधिक रेशन मिळेल. त्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

Advertisement

कोरोनाची दुसरी लाट आल्यावर मोदी सरकारने दोन महिन्यांसाठी गरजूंना मोफत रेशन देण्याची घोषणा केली होती, आता त्याची मुदत नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. मागील वर्षीही पंतप्रधान मोदी यांनी 80 कोटी देशवासीयांना मोफत रेशन जाहीर केले होते. ते छठ पूजेपर्यंत पात्र लोकांना मोफत मिळाले.

Advertisement

राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत देशात सुमारे 23 कोटी शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना शासनाने अनुदानावर दिलेल्या मोफत धान्य योजनांचा लाभ मिळतो. मात्र, आता ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांनाही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्नयोजनेंतर्गत मोफत रेशन मिळणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply