Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक बातमी : पहा काय आल्यात कोविड-19 च्या नवीन गाईडलाईन्स

नाशिक : करोना झाला म्हणजे आपला विषयच संपला असेच काहींना वाटून अनेकांचे बळी गेलेले आहेत. कारण, माध्यमे आणि सरकारच्या उलटसुलट उपचार पद्धतीमुळे नेमके काय करावे आणि कोणाला काहीही होणार नाही याचाच घोळ अजूनही मिटलेला नाही. प्लाझ्मा थेरेपी आणि रेमिडीसिविअर इंजेक्शन हा त्याचाच नमुना होता. दुसऱ्या लाटेत अनेकांचे लाखो रुपये दवाखान्यात गेल्यावर आताही नवीन गाईडलाईन्स आलेल्या आहेत.

Advertisement

लक्षणे नाहीत, पण करोना आहे अशा रुग्णांसाठी या गाईडलाईन्स खूप महत्वाच्या आहेत. सध्याच्या गाईडलाईन्सनुसार सौम्य किंवा माध्यम स्वरुपात लक्षणे असलेल्या रुग्णांना कोणत्याही खास उपचाराची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. मधल्या काळात गावोगावी कोणत्याही सुविधेविना रुग्णांना विलगीकरण कक्षात राहून करोनातून बरे व्हावे लागले होते. त्यांच्या सुविधेबाबत अजूनही काहीच ठोस कार्यवाही झालेली नसताना नव्या गाईडलाईन्स आल्याने यापुढे करोना झाल्यास किमान दिलासा मिळणार आहे. मात्र, या नव्या गाईडलाईन्स किती दिवस चालणार आणि किती दिवसांनी बदलणार यावरच याचा दिलासादायक कालावधी ठरणार आहे.

Advertisement
नव्या गाईडलाईन्सचे मुद्दे :
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांत हा महत्त्वाचा बदल केलेला आहे
ज्या रुग्णांत कोरोनाची लक्षणे नसतील किंवा ती खूपच सौम्य असल्यास त्यांना कोणत्याही प्रकारची औषधे घेण्याची गरज नाही
त्यांना इतर आजारांची औषधे सुरू असतील तर त्या सुरूच राहतील
रुग्णांनी अावर्जून डॉक्टरांचा सल्ला आणि पोषक आहार घ्यावा
मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगसारख्या आवश्यक नियमांचे पालन करावे
लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या उपचारांतून सर्व औषधांची यादी हटवण्यात आली आहे
अशा रुग्णांना दुसरी चाचणी करण्याचीही गरज नाही
सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना झिंक, आयव्हरमेक्टिन, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, डॉक्सीसायक्लिन व मल्टिव्हिटामिन देण्यास मनाई
लक्षणे नसलेल्या रुग्णांना सीटी स्कॅनसारख्या अनावश्यक चाचण्या लिहून देण्यासही मनाई

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply