Take a fresh look at your lifestyle.

‘कोविशील्ड Vs कोव्हॅक्सिन’मध्ये ‘त्या’ लसमुळे वाढल्यात जास्त प्रमाणात अँटिबॉडी

मुंबई : कोरोना व्हायरस व्हॅक्सिन इन्ड्युस्ड अँटिबॉडी टायटर (कोव्हॅट) नावाचे एक संशोधन चालू आहे. या संशोधन अहवालाचे निष्कर्ष क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. कारण, या अध्ययनाचा आढावा घेण्यात आलेला नाही.

Advertisement

मात्र, याद्वारे ‘कोविशील्ड Vs कोव्हॅक्सिन’मध्ये नेमकी कोणती लस जास्त प्रभावी आहे याचा अभ्यास केला जात आहे. दोन्ही डोस घेणाऱ्या ५२२ आरोग्य कर्मचाऱ्यांवर (३२५ पुरुष आणि २७७ महिला) हे अध्ययन करण्यात आलेले आहे. यातील ४५६ लोकांना कोविशील्ड तर ९६ जणांना कोव्हॅक्सिन लस टोचलेली होती. त्यातून कोविशील्ड घेणाऱ्यांत ९८.१% तर कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांत ८०% सीरोपॉझिटिव्हिटी असल्याचे दिसलेले आहे.

Advertisement

म्हणजेच कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशील्ड या लसमध्ये अँटिबॉडी तयार करण्याची क्षमता काहीअंशी जास्त आहे. मात्र, दोन्हीही लसींनी रोगप्रतिकार क्षमता चांगली वाढत असल्याचे स्पष्ट झालील आहे. त्यामुळे आपल्या भागात कोणतीही लस मिळत असो, नागरिकांनी ती घ्यावी. तसेच आता रशियातून आयात केलेली स्पुटनिक-व्ही नावाची लसही देशभरात उपलब्ध होत आहे. तीही घेण्याचा पर्याय आहे. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर शरीरात कोव्हॅक्सिनच्या तुलनेत अँटिबॉडीची पातळी जास्त आढळली असल्याने हीच लस मिळण्याचा अट्टाहास कोणीही करू नये. कारण, दोन्ही लस प्रभावी असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply