Take a fresh look at your lifestyle.

भाजपशासित राज्यांमध्ये केला जातोय ‘तो’ गंभीर प्रकार; पहा नेमके काय म्हटलेय राष्ट्रवादीने

मुंबई : कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येवरुन देशात नवाच वाद सुरू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची जी आकडेवारी राज्य सरकारे देत आहेत, त्यावर विरोधकांचा विश्वास नाही. आणि केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आकडेवरही राज्ये विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. या मुद्यावर आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण जोरात सुरू झाले आहे. देशातील कोरोना मृत्यूंबाबत काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी सुद्धा अहवाल प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये देखील कोरोना मृत्यूंच्या संख्येबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या राजकारणास आधिकच वेग आला आहे.

Advertisement

या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले, की ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे, तेथेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे खरे आकडे लपवले जातात. भाजपसारखे आकडे लपवण्याचे काम आम्ही करत नाही. केंद्र सरकारच्या नियमांप्रमाणे राज्यात पहिल्या दिवसापासून कोरोना रुग्णांची नोंद पारदर्शकपणे करण्यात आली आहे. राज्य सरकारने कोणतेही आकडे लपवून ठेवले नाहीत. जी वस्तूस्थिती आहे, त्यास जनतेसमोर ठेवले आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत चार लाख जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र, हा आकडा खूप मोठा आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात तर असे म्हटले आहे, की देशात हा आकडा ४० लाख आहे. भाजप शासित राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे आकडे लपवले जात आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातमध्ये असे प्रकार घडले आहेत.

Advertisement

दरम्यान, भाजपने सुद्धा या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका केली होती. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारच्या हलगर्जीपणाच्या कारभारामुळेच राज्यात कोरोना मृत्यूंचा आकडा एक लाखांच्या पुढे गेला आहे, असा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांत मृत्यूंची संख्या कितीतरी कमी आहे. राज्य सरकारच्या धोरणांमुळेच कोरोना मृत्यूंच्या संख्येत राज्य आज जगात दहाव्या क्रमांकावर आहे. या अपयशावरुन नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात आंदोलनाचे नाटक केले, अशी टीका उपाध्ये यांनी केली. या प्रमाणेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही भाजपने आरोप केला होता. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची खरी माहिती केजरीवाल देत नाहीत, असा आरोप केला होता. राजस्थान सरकारने तर विरोधकांच्या आरोपांनी हैराण होऊन कोरोना काळात राज्यात झालेल्या मृत्यूंचे ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply