Take a fresh look at your lifestyle.

मोदीजी दाढी करा..! बारामतीच्या चहावाल्याने पंतप्रधानांना पाठविली 100 रुपयांची मनिऑर्डर, ‘या’ कारणामुळे पाठविले पैसे..!

पुणे : कोरोनामुळे सतत करण्यात येणाऱ्या लाॅकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. रोजगार बुडाले. काहींचे दोन वेळच्या खाण्याचे वांधे झाले. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, घरात बसून अनेकांना वेड लागायची वेळ आली. मात्र, कोरोनापासून बचाव करायचा, तर हे आवश्यकही होते. मात्र, आता हे बस्स.. असं म्हणण्याची वेळ आलीय..

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दाढी वाढविल्याचे दिसत आहे. त्यावरुन सोशल मीडियावर सतत ‘मिम्स’ (Mims) पडत असतात. मात्र, बारामतीच्या (Baramati) एका चहावाल्याने कहरच केला. थेट पंतप्रधान मोदी यांनाच दाढी करण्यासाठी 100 रुपयांची मनिऑर्डर (money order) पाठवली. त्याच्या या कारनाम्यामुळे सध्या हा चहावाला सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे.

Advertisement

अनिल मोरे, असे या चहावाल्याचे नाव आहे. बारामती शहरातील इंदापूर रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयासमोर त्याची चहाची टपरी आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात दोनदा ‘लॉकडाऊन’ करण्यात आलं. त्यामुळे टपरी बंदच राहिल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालविणेही त्याच्यासाठी अवघड झाले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या मोरे याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठवून मागण्या मांडल्या. सोबत 100 रुपयांची मनिआॅर्डरही केली.

Advertisement

“पंतप्रधान मोदी दाढी वाढवून फिरत आहेत. त्यांना काही वाढवायचेच असेल, तर त्यांनी लोकांसाठी रोजगार वाढवावेत. आरोग्य सुविधांसह लसीकरण केंद्रे वाढवावित. लोकांची समस्या कशा सुटतील, याची काळजी घ्यावी. पंतप्रधान मोदी हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. मला त्यांच्याबद्दल आदरच आहे. त्यांना कोणताही त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. परंतु, कोरोनामुळे लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. लोकांच्या आरोग्यासह रोजगार वाढविण्याच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी हा मार्ग स्वीकारला,” असे त्याने सांगितले.

Advertisement

माझ्या कमाईतून पंतप्रधान मोदी साहेबांना दाढी करण्यासाठी मी 100 रुपये पाठवित आहे. मनीऑर्डरसोबत पत्र पाठवून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला पाच लाख रुपयांची मदत करावी, तसेच यापुढे लॉकडाउन केल्यास, कुटुंबासाठी प्रत्येकी 30 हजार रुपये देण्याची मागणी मोरे याने केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply