Take a fresh look at your lifestyle.

म्हणून चीनच्या विद्यापीठ कॅम्पसलाही होतोय जोरदार विरोध; पहा कसा झटका बसणार जीनिपिंग सरकारला

दिल्ली : अवघ्या जगास कोरोना महामारीच्या भयानक संकटात ढकलणाऱ्या कुरापतखोर चीनची जगभरात बदनामी झाली आहे. तरी देखील या देशाची अक्कल ठिकाणावर आलेली नाही. संकटाच्या काळातही त्रास देण्याचे उद्योग चीनने सोडलेले नाहीत. लहान देशांना कर्जाच्या सापळ्यात अडकवायचे, त्यांना धमकवायचे, विनाकारण त्रास द्यायचा, असे कारनामे चीनही आजही करत आहे. जगही चीनच्या या कारवायांनी हैराण झाले आहे. त्यामुळेच तर लहान देश सुद्धा चीनच्या विरोधात आवाज उठवू लागले आहेत. चिनी विचारांना सुद्धा विरोध होत आहे.

Advertisement

अमेरिका आणि भारतासारख्या देशांनी चीनचा घातकी स्वभाव माहिती आहेच. युरोपातील देशांना चीनचा हा अनुभव नव्हता. मात्र, कोरोनामुळे चीन काय आहे, हे त्यांना देखील चांगलेच समजले आहे. त्यामुळे एखादी युनिव्हर्सिटी सुरू करायचे म्हटले तरी त्याला देशातील नागरिक सुद्धा विरोध करत आहेत. होय, असाच एक प्रकार हंगेरी या देशात घडला आहे. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे चीनच्या फुदान युनिव्हर्सिटीचे कॅम्पस सुरू केले जाणार आहे. मात्र, लोकांनी या निर्णयास तीव्र विरोध करत जोरदार आंदोलन सुरू केले आहे. चीनच्या दबावामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप केला जात आहे. कॅम्पस जर सुरू झाले तर येथे कम्युनिस्ट विचारांचा दबदबा वाढेल, अशीही भिती लोकांना वाटत आहे.

Advertisement

ज्यावेळी हा निर्णय घेतला गेला त्यावेळीही विरोध झाला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कारण, विरोधाचे स्वरुप जास्त मोठे नव्हते. आता मात्र, लोकांनी पुन्हा विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी मात्र हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी सरकारवर आरोप करत या निर्णयास विरोध केला आहे. तसेच विरोध वाढत चालला आहे. त्यामुळे हंगेरी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत आता हंगेरी सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकूणच सध्या जगभरातचीनच्या विरोधात वारे जोरात असून, राष्ट्राध्यक्ष क्षी जीनिपिंग यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी युरोपातीलच लिथुआनिया या देशाने सुद्धा चीनला झटका दिला होता. या देशाने चीनने तयार केलेल्या एका संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. चीन सध्या विभाजनकारी धोरणांना प्राधान्य देत असल्याचा आरोप करत या देशाने चीनला विरोध केला. त्यानंतर आता पुन्हा युरोपातच चीनला दुसऱ्यांदा विरोधाचा सामना करावा लागत आहे. युरोपातील देशांनीही चीनचा कावेबाजपणा ओळखला आहे. त्यामुळेच येथील लहानसे देश सुद्धा चिनी अहंकाराच्या विरोधात उभे राहिले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply