Take a fresh look at your lifestyle.

‘हे’ सगळे पाहून मोदी सरकारही होईल का हतबल? पहा नेमकी काय आहे देशभरात परिस्थिती

दिल्ली : करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच देशभरात अनलॉकची प्रक्रिया जोरात चालू झाली आहे. त्यातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार असल्याची बातमी येत आहे. सायंकाळी 5 वाजता ते कोणता संदेश किंवा मंत्र देतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी देशभरात लॉकडाऊन शिथिल झाल्याने अनेक ठिकाणी गर्दी ओसंडून वाहत आहे. त्यावर मोदी सरकारही हतबल झाले असे की नाही, असेच प्रश्न उपस्थित होत आहेत.

Advertisement

NBT Hindi News on Twitter: “आज PM मोदी के मन में क्या? शाम 5 बजे बोलेंगे, लेकिन अभी से लग रहीं ये अटकलें #PMModi #COVID19 https://t.co/W2AEP8L4lv” / Twitter

Advertisement

‘Unlock News: अनलॉक के पहले दिन की ये तस्वीरें डरा रही हैं, देखकर पीएम मोदी को भी होगी टेंशन’ अशी बातमी यानिमित्ताने नवभारत टाईम्स या आघाडीच्या दैनिकामधील ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्ध झालेली आहे. त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया लिहिण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी उलट नरेंद्र मोदी यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या दमदार सभांची आठवण काढली आहे. एकूणच आज मोदीजी कोणता कानमंत्र देणार की मोठी घोषणा करून आपल्यावर असलेली नाराजी एकाच फटक्यात दूर करण्याची कार्यवाही करणार याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

देशभरात लॉकडाऊन शिथिल झाल्यावर बस स्थानक, मजूर अड्डे आणि दुकानात गर्दी होत आहे. महिनाभर काहीही खरेदी न केल्याने संसारात आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी ही खरेदी त्यांना करावी लागत आहे. त्यातच सरकारच्या उलटसुलट धोरणामुळे कधीही पुन्हा लॉकडाऊन किंवा कडक नियम लागू होण्याची भीती नागरिकांना आहे. त्यामुळेही जास्त प्रमाणात गर्दी होत आहे. त्यावर मोदीजी काय भाष्य करणार, याकडे देशाचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply