Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या ‘त्या’ कृतीमुळे वाढलेत इंधनदर; पहा काय टीका केलीय राहुल गांधींनी

दिल्ली : कोरोना पाठोपाठ आता महागाईचा मार नागरिकांना सहन करावा लागत आहे. महागाई तर काही केल्या कमी होण्याचे नाव घेईना. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने तर नुसता उच्छाद मांडला आहे. रोजच भाव वाढत आहेत. खाद्यतेलांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. कोरोनाने लोकांकडे फार पैसाच ठेवला नाही. त्यामुळे खर्च कमी करुन काटकसर करण्याचा लोकांचा प्रयत्न आहे. सरकारला या परिस्थितीची जाणीव नाही, असेही नाही. मात्र, सगळे माहित असूनही नागरिकांना दिलासा देण्यासाठी काहीच कार्यवाही होत नाही.

Advertisement

इंधन दरवाढीच्या बाबतीत तर हे अगदी स्पष्टच दिसत आहे. त्यामुळे सरकारच्या या कारभारावर विरोधक जोरदार टीका करत आहे. काँग्रेसने तर देशात ठिकठिकाणी आंदोलनेही केली आहेत. त्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की मोदी सरकारच्या काळात टॅक्स वसूली महामारीच्या लाटा सारख्या येत आहेत. त्यामुळे महागाई सातत्याने वाढत असून नागरिकांचे जीवन देखील कठीण होत आहे. यानंतर काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनीही मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ‘मागील १३ महिन्यांच्या काळात पेट्रोल २५.७२ रुपये, डिझेलच्या दरात २३.९३ रुपये वाढ झाली आहे. अनेक राज्यात तर पेट्रोलने शंभरचा टप्पा सुद्धा पार केला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीस कच्च्या तेलाच्या किमती नाही तर मोदी सरकारने वाढवलेला टॅक्स कारणीभूत आहे.’

Advertisement

दरम्यान, इंधनाच्या दरवाढीतून आजही नागरिकांना दिलासा मिळाला नाही. पेट्रोलियम कंपन्यांची मनमानी दरवाढ सु़रुच आहे. विशेष म्हणजे, जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. तरी सुद्धा कंपन्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकार सुद्धा यावर काहीच निर्णय घेताना दिसत नाही. कारण, इंधनावरील कराच्या माध्यमातून राज्यांनाही महसूल मिळतो. त्यामुळे या दोन्ही सरकारांकडून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सध्या होताना दिसत नाही. दुसरीकडे मात्र या महागाईत सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. खाद्यतेलांचे भाव खूप वाढले आहेत. डाळी आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यातच कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. या संकटात देशातील जवळपास ९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. अशा कठीण काळात नागरिकांना दिलासा देण्याऐवजी भाववाढ करुन त्यांना जास्तच त्रास दिला जात आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply