Take a fresh look at your lifestyle.

काँग्रेस झालीय आक्रमक; पहा मोदी सरकारला काय दिलाय इशारा

मुंबई : देशात इंधनाचे दर सातत्याने वाढत चालले आहेत. काही शहरात तर पेट्रोलने शंभरचा टप्पा पार केला आहे. डिझेलही त्याच दिशेने वाटचाल करत आहे. या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. विरोधी पक्ष आंदोलने करत आहे. नेते मंडळी जोरदार टीका करत आहेत. तरी सुद्धा काहीच फरक पडलेला नाही. आता तर आगामी काळात इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे खुद्द पेट्रोलियम मंत्रीच सांगत आहेत. सरकारवर काहीच परिणाम होत नसल्याचे पाहून विरोधक आता आधिक आक्रमक झाले आहेत.

Advertisement

केंद्र सरकारने इंधनाचे दर कमी करावेत, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे. काँग्रेस सध्या देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. मात्र, सरकारवर त्याचा परिणाम होत नसल्याने आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पटोले यांनी दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सहभागी झाले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत पटोले यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, की युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंह यांनी इंधन दरवाढीचा फटका जनतेस बसू नये यासाठी दर स्थिर ठेवले होते. मात्र, आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी झालेले असतानाही भरमसाठ कर रुपाने नफेखोरी केली जात आहे.

Advertisement

दरम्यान, या मुद्द्यावर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करुन केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध केला जात आहे. केंद्र सरकारने इंधन दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी केली जात आहे. मात्र, केंद्र सरकार सध्या दर कपात करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. पेट्रोलियम मंत्रीच इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे म्हणत आहेत. कोरोना काळात सरकारचा आरोग्यावरील खर्च वाढला आहे. मागील आर्थिक वर्षात उत्पन्न घटले आहे आणि २०२१-२२ या वर्षात उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे नजीकच्या काळात दर कपात होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे मात्र विरोधी पक्ष सरकारवर दबाव आणण्याची रणनिती तयार करत आहेत. आंदोलने आणि जोरदार टीका होत आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. केंद्र सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply