Take a fresh look at your lifestyle.

‘पार्ले-जी’च्या चपात्या येणार आता तुमच्या ताटात..! पाहा ‘पार्ले-जी’ने काय निर्णय घेतलाय..?

नवी दिल्ली : पार्ले-जी.. भारतातील सर्वाधिक विक्री होणारा बिस्कीट ब्रँड. 1929 साली स्थापन झालेली ही कंपनी देशात स्नॅक्स आणि मिठाईची विक्री करते. मात्र, आता लवकरच तुम्ही या कंपनीच्या चपात्या खाऊ शकणार आहेत. कारण, देशातील सर्वात मोठी बिस्कीट कंपनी पार्ले-जी लवकरच आपले पीठ बाजारात आणणार आहे. आशीर्वादसह पतंजली कंपनीला पार्ले-जी टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

कोरोना संकटात ब्रँडेड पीठ घेणाऱ्यांची संख्या वाढलीय. बहुतेक लोक ऑनलाईन वस्तूंची ऑर्डर देत आहेत, अशा परिस्थितीत पॅकेटच्या पिठाची मागणी वाढलीय. लोकांना चांगल्या प्रतीचे पीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पार्ले जी कंपनी आपले पीठ बाजारात आणणार असल्याचे ‘पार्ले प्रॉडक्ट्स’चे वरिष्ठ प्रवर्ग प्रमुख मयंक शाह यांनी सांगितले.

Advertisement

शहरी आणि ग्रामीण दोन्ही बाजारात ‘पार्ले-जी’ चक्की आटा’ विकले जाईल. या ब्रँडचा विश्वास इतर खाद्यपदार्थांवरही वाढविण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. ग्राहकांना दर्जेदार गव्हाचे पीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हे उत्पादन बाजारात आणले जात आहे. 2020 च्या ब्रँड फूटप्रिंट रँकिंग अभ्यासात पार्ले अव्वल होते. 2020 च्या क्रमवारीत पार्लेची सर्वाधिक सीआरपी (मिलियन) 6029 होती, जी मागील रँकिंगपेक्षा 12 टक्के जास्त होती.

Advertisement

लक्षावधी भारतीय घरातील दररोज वापरल्या जाणाऱ्या पिठाची मागणी पूर्ण करणाऱ्या छोट्या स्थानिक गिरण्यांना स्वच्छता आणि सुविधांमध्ये आणखी वाढ करण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन स्पर्धक कंपनी आयटीसी लिमिटेडने ब्रॅंडेड गव्हाच्या पिठाच्या रूपात आशीर्वाद आटा बाजारात आणला, ज्याचा त्यांना खूप फायदा झाला.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply