Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ निर्णयाचा बसणार भाजपला झटका; पहा ‘महाविकास’ने कोणता डाव टाकण्याची तयारी केलीय निवडणुकीसाठी

मुंबई : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रामीण भागातून भाजपला बॅकफूटवर आणतानाच शहरी भागात अगोदरच सक्षम असलेल्या भाजपला झटका देण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे. त्यासाठी महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेऊन भाजपला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने नियोजन चालू आहे. त्याबद्दलच राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार माहिती दिली आहे.

Advertisement

कॉंग्रेस पक्षाने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर औरंगाबाद, मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन प्रभाग रचना बदलण्यासाठीची कार्यवाही होणार असल्याचे सुतोवाच अजित पवारांनी केले आहे. २०१७ मध्ये चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे भाजपला फायदा झाला होता. त्यामुळेच भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने मुंबई महापालिकेच्या प्रभागाच्या सीमा पूर्ववत करण्याचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयास दिले आहे.

Advertisement

औरंगाबाद,नवी मुंबई,ठाणे यासह दहा महानगर पालिकांच्या निवडणुका करोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. त्यातच झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीसह मुंबई, पुणे आणि इतर महापालिकेची निवडणुकही नियोजित आहे. त्या एकाच निवडणुकीत महाराष्ट्राची राजकीय हवा स्पष्ट होणार आहे. त्यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. तर, स्थानिक पातळीवर असलेली नाराजी दूर करून एकत्रित लढण्याचे मोठे आव्हान शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षासमोर आहे.

Advertisement

तत्कालीन फडणवीस सरकारने सध्याची चार सदस्यीय प्रभाग रचना केल्याचा २०१७ मध्ये भाजपला फायदा झाल्याचे म्हटले जात आहे.  चार सदस्यीय प्रभाग रचनेच्या बदलामुळे राष्ट्रवादीची पुणे महापालिकेतील सत्ता गेली असेही म्हटले जात आहे. त्यामुळेच आता भाजपला अडचणीत आणण्याचा डाव खेळण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पालिकेकडे मतदान याद्या व इतर तयारीसंदर्भात नुकतीच विचारणा केली आहे. त्यामुळे निवडणुका ठराविक मुदतीत घेण्याचीच तयारी असल्याचे चित्र सध्यातरी आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply