Take a fresh look at your lifestyle.

ठाकरे सरकारच्या निर्णय विसंगतीवर काँग्रेसने ठेवलेय बोट; पहा नेमके काय म्हटलेय अनलॉकच्या निर्णयाबाबत

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. मात्र, सध्या रुग्णसंख्या कमी होत असल्याने अनलॉक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आजपासून या निर्णयाची पाच टप्प्यात अंमलबजावणी होत आहे. तिसऱ्या टप्प्यात मुंबईचा समावेश केला आहे. त्यामुळे या शहरात काही प्रमाणात निर्बंधांत सवलती दिल्या आहेत. या मुद्द्यावर मात्र काँग्रेसनेच राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘मुंबईत लॉकडाऊनच्या निर्बंधात काही प्रमाणात सवलती दिल्या आहेत. पण, यामुळे लोकांना जास्त कष्ट होणार आहेत. कार्यालये सुरू होत आहेत पण सार्वजनिक वाहतूक नाही. एकतर बसेसची संख्या वाढवा किंवा काही प्रमाणात लोकल सुरू करावी. नाहीतर लोक ऑफीसला जाणार तरी कसे, वर्क फ्रॉम ऑफीसच्याही काही मर्यादा आहेत.’

Advertisement

निरुपम यांनी याआधी सुद्धा राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली होती. लॉकडाऊनच्या मुद्द्यावरही विरोध केला होता. दुसऱ्या लाटेत ज्यावेळी रुग्णसंख्या वेगाने वाढत होती, त्यावेळी राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार केला जात होता. त्यानुसार नियोजनही सुरू होते. त्यावेळी मात्र निरुपम यांनी यास विरोध केला होता. ते म्हणाले होते, की राज्य सरकारचे नियोजन चुकीचे आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊनचा करण्याचा जो विचार आहे त्यास आमचा विरोध आहे. कारण, पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. कारखाने बंद पडल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका, असे त्यांनी सांगितले होते. त्याऐवजी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करा असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Advertisement

त्यानंतर मात्र राज्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या जास्तच वाढली. त्यामुळे राज्य सरकारने एप्रिल महिन्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र रुग्णसंख्या कमी होत असल्याने पाच टप्प्यात अनलॉकचा निर्णय घेतला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. तसेच आता तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनलॉक केले असले तरी एकाच वेळी निर्बंध कमी केलेले नाहीत. निर्बंधांबाबत जिल्हा प्रशासनांना अधिकार दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यावेत, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply