Take a fresh look at your lifestyle.

मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना केलेय ‘ते’ महत्वाचे आवाहन; पहा नेमके काय म्हटलेय सरकारने

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी होत असल्याने अनलॉकचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात आजपासून पाच टप्प्यात अनलॉक होत आहे. अनलॉकचा निर्णय घेतला असला तरी एकाच वेळी सगळ्या सवलती दिलेल्या नाहीत. याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन निर्णय घेणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी राज्यातील उद्योजकांना याबाबत मार्गदर्शन केले.

Advertisement

राज्यात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. युकेतील विषाणू किंवा त्यापेक्षाही जास्त धोकादायक पद्धतीने आपल्याकडे संसर्गाचा धोका वाढला होता. त्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला. आता मात्र आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्हीही नको आहेत. यासाठी आधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. उद्योगांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, कामगारांचे लसीकरण करुन घेणे, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देणे याकडे जास्त लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. ज्या लोकांना ऑफीस किंवा कंपनीत यावेच लागणार आहे, त्यांच्यासाठी बायो बबल तयार करावा. तसेच कामगार व कर्मचाऱ्यांसाठी त्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी, यासाठी राज्य सरकार सुद्धा मदत करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

मागील वेळी बाहेरुन येणाऱ्या कामगारांची नोंद ठेवली नव्हती. त्यामुळे सुद्धा संसर्गाचा धोका वाढला होता. यावेळी मात्र राज्य सरकारने बाहेरुन येणाऱ्या कामगारांची नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. उद्योगांनीही कामगारांची नोंद ठेवावी. बाहेर राज्यातून आल्यानंतर सात दिवस क्वारंटाइन ठेऊन नंतर तपासणी करुनच संबंधित कामगारांना हजर करुन घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Advertisement

दरम्यान, राज्यात आता रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे आजपासून पाच टप्प्यात अनलॉक होत आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. अनलॉक केले असले तरी निर्बंधांत सरसकट सवलती नाहीत. कोणत्याही टप्प्यात कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह येथे गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. निर्बंधांबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन निर्णय घेईल. संसर्ग किती वाढेल याबाबत काही शंका असतील तर पुन्हा निर्बंध घोषित करण्याच्याही सूचना राज्य सरकारने प्रशासनास दिल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply