Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पिऊ नयेत ‘त्या’ गोष्टी; पहा नेमके काय आहेत याचे सेक्स लाईफवर दुष्परिणाम

तुम्हाला थंब्सअप, पेप्सी, कोका कोला, लिम्का, मिरिंडा, फॅन्टा, 7 युपी फिझी ड्रिंक किंवा डायट कोला असे पेय पिणे आवडते का? किंवा गोडपणा आणण्यासाठी आणि चव वाढविण्यासाठी काढ्यात साखर घालणे आवडते काय? जर याचे उत्तर होय, तर आपण असे पेय पिऊन आपल्याच आरोग्यासोबत खेळ करत आहात. विशेषत: जेव्हा आपण बाळांच्या जन्माच्या नियोजनाचा विचार करीत असताल तर, या टप्प्यावर असे पेय सेवन केल्याने गर्भवती होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. संशोधनात हे उघड झाले आहे की खाण्यापिण्याच्या काही गोष्टींचा तुमच्या हार्मोनल पातळीवर परिणाम होतो. (Thumbs Up, Pepsi, Coca Cola, Limca, Mirinda, Fanta, 7Up, Fizzy drinks, diet cola disadvantages on sexual life)

Advertisement

ही सर्वप्रकारचे सोडा पेय आणि शर्करायुक्त पेय कृत्रिम स्वीटनर्सने समृद्ध असतात. ते केमिकलवर आधारित असतात. अशा परिस्थितीत जेव्हा आपण बाळाच्या नियोजनाबद्दल विचार करत असाल, तेव्हा आपण त्यांचे सेवन करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे. कारण अशा गोष्टींचा दररोज सेवन केल्याने प्रजनन शक्तीवर आणि नियोजनावर परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते, आपण आई / बाप बनण्याची योजना आखत असलेल्या सर्वच जोडप्यांनी सोडा पेयांचे सेवन मर्यादित केले पाहिजे.

Advertisement

अन्यथा दोघांच्या लैंगिक ड्राइव्हवर विपरीत परिणाम होऊ शकतो. संशोधनात असे दिसून आले आहे की ज्या स्त्रिया प्रजनन उपचार घेत आहेत, जर ते नियमितपणे सोडा, डायट कोला यांचे आहारात सेवन करतात तर त्यांचे मूल होण्याची शक्यता कमी होते. संशोधनात असे दिसून आले आहे की, दररोज एक सोडा बॉटल पिण्यामुळे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्व समस्या 20-25 टक्क्यांनी वाढू शकतात. हे दुष्परिणाम फक्त नैसर्गिक प्रजननापुरतेच मर्यादित नाहीत. आपण आययूआय आणि आयव्हीएफ तंत्राद्वारे बाळाची योजना आखत असाल तर त्यातही याचे नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात.

Advertisement

अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, सोडा ड्रिंकच्या अतिसेवनाने केवळ स्त्रियाच नव्हे तर पुरुषांच्यामध्ये वंध्यत्वाचे प्रचंड परिणाम दिसतात. जे पुरुष दररोज सोडा पितात त्यांच्यात शुक्राणूंची संख्या, गतिशीलता आणि प्रजनन क्षमता किंवा सेक्स ड्राइव्हवर नकारात्मक प्रभाव पडतो. संशोधनात असेही आढळले आहे की, सोडा जास्त सेवन केल्याने शरीरात फ्री रॅडिकल्स देखील निर्माण होऊ शकतात. ज्यामुळे सर्व शुक्राणू आणि बीजांड नष्ट होऊ शकतात. अॅसिडिक पेय असल्याने शरीराच्या पीएच पातळीमध्ये बदल होऊन प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. तसेच काहींना पिरीयडमध्ये ब्लीडींग कमी होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply