Take a fresh look at your lifestyle.

झालेय की नियोजन; ‘त्या’ शहरातून होणार पेट्रोल-डीझेल हद्दपारच, पहा नेमके काय करणार गुजरात सरकार

अहमदाबाद : प्रदूषणच्या समस्येने आज पर्यावरणाचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे. शहरांमध्ये तर मोकळा श्वास घेणे सुद्धा दुरापास्त झाले आहे. मानवी आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रदूषण कमी करा, असे कितीदा कानीकपाळी ओरडून सांगितले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. ज्यावेळी प्रदूषण कमी करुन पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे, त्याचवेळी प्रदूषणात बेसुमार वाढ होत आहे. जागतिक तापमान वाढ, प्लास्टिकच्या कचऱ्यात वाढ, भीषण दुष्काळ अशा अनेक संकटांना आज तोंड द्यावे लागत आहे.

Advertisement

प्रदूषण वाढत असल्याने माणसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पृथ्वीचे संकटही वाढले आहे. त्यामुळे प्रदूषणाची h#समस्या कमी करण्यासाठी प्रयत्नही होत आहे. भारताने यामध्ये कायमच पुढाकार घेतला आहे. वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण ही सुद्धा एक गंभीर समस्या आहे. देशातील मोठ्या शहरात प्रदूषण वेगाने होत आहे. शहरे जसजशी विस्तारत आहेत, तसा पर्यावरणाचा धोकाही वाढत आहे. काही शहरांत तर प्रदूषणाने धोक्याची पातळी देखील पार केली आहे. त्यामुळे आता हे संकट कमी करण्याचे शहाणपण सुचले आहे. वाहनांद्वारे होणारे प्रदूषण पूर्णपणे कसे बंद करता येईल, याचा विचार सुरू झाला आहे. पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रीक वाहनांना प्राधान्य देण्याच्या योजना तयार केल्या जात आहेत, तुम्हाला ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही पण, देशातील एक शहरातून इंधनावर चालणारी वाहने लवकरच हद्दपार होणार आहेत. होय, राज्य सरकारने त्यानुसार कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

Advertisement

गुजरात राज्यातील केवडिया शहरात आता पेट्रोल आणि डिझेलवर चालणारे एकही वाहन दिसणार नाही, येथे फक्त बॅटरीवर चालणारी वाहने दिसतील. स्टॅच्यू ऑफ युनिटी क्षेत्र विकास आणि पर्यटन संचालन प्राधिकरणाने सांगितले, की या शहरात लवकरच इलेक्ट्रीक व्हेईकल ओन्ली एरिया विकसित केल जाणार आहे. त्यामुळे या शहरात केवळ इलेक्ट्रीक वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी सुद्धा इलेक्ट्रीक बस असतील. तसेच येथील नागरिकांना तीन चाकी ई वाहन खरेदी करण्यासाठी मदत करण्याचे नियोजन आहे. विशेष म्हणजे, या शहरात प्रदूषण निर्माण करणारा एकही उद्योग नाही. अशा उद्योगांना येथे परवानगीच दिलेली नाही. त्यानंतर आता या शहरात प्रदूषण करणाऱ्या वाहनांना सुद्धा लवकरच नो एन्ट्री केली जाणार आहे. या पद्धतीने नियोजन केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply