Take a fresh look at your lifestyle.

लसीकरण करून जिंका दणक्यात बक्षीस; पहा नेमक्या कोणत्या ठिकाणी चालू आहेत ऑफर्स

चेन्नई : कोरोनाच्या संकटावर मात करायची असेल तर लसीकरणाला पर्याय नाहीच, हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यामुळे काहीही करुन लवकरात लवकर लसीकरण झाले पाहिजे, यासाठी सगळेच देश आटापिटा करत आहेत. काही देशांनी तर शंभर टक्के लसीकरण करुन कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. मात्र, जगात असेही काही देश आहेत, की ज्यांना अजून कोरोना लसही माहित नाही. तर दुसरीकडे काही देशांनी लसीकरण सुरू केले आहे मात्र, लसींची कमतरता असल्याने लसीकरणचा वेग खूपच कमी आहे. लोकांच्या मनात शंका असल्यानेही लोक लस घेण्यास टाळाटाळ करतात, असेही प्रकार घडत आहेत. तर काही ठिकाणी लोकांनी लसीकरण करावे, यासाठी त्यांना बक्षीसे देण्याच्या भन्नाट आयडीया वापरल्या जात आहेत. बक्षीसे पण काय, लसीकरण केले तर बिर्याणी, मोबाइल रिचार्ज कुपन तसेच आठवड्यातून एकदा लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement

निवडणुकीत मतदारांना आश्वासने देण्यात तामिळनाडू हे राज्य देशात आघाडीवर आहे. निवडणूक काळात उमेदवार अगदीच भन्नाट आश्वासने मतदारांना देतात. निवडून आल्यानंतर यातील किती आश्वासने पूर्ण होतात, हे त्यांनाच ठाऊक. त्यानंतर आता कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने व्हावे यासाठीही अशाच आयडीया वापरल्या जात आहेत. येथील कोवलम शहरात एक एनजीओ लसीकरण केलेल्या लोकांना बिर्याणी, मोबाइल रिचार्ज कुपन असे गिफ्ट देत आहे. तसेच आठवड्यातून एकदा लकी ड्रॉ काढण्यात येतो. यातील विजेत्यांना सोन्याचे नाणे, मिक्सर, ग्राइंडर, स्कूटी, वॉशिंग मशीन अशी बक्षीसे जिंकण्याची संधी आहे.

Advertisement

या शहरात लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बक्षीसांची योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर मात्र आता येथे लसीकरणाने वेग घेतला आहे. लोकांच्या मनात काही शंका होत्या, या शंका दूर करण्यात आल्याने नागरिक लस घेण्यास तयार होत आहेत, असे संस्थेने सांगितले. कोवलम या शहरात एसटीएस फाऊंडेशन, सीएस रामदास ट्रस्ट आणि न्यूयॉर्क येथील चिराग यांनी या योजनेची सुरुवात केली आहे.

Advertisement

एसटीएस फाऊंडेशनचे विश्वस्त जे. सुंदर यांनी सांगितले, की या योजनेचा परिणाम दिसून आला आहे. शहरात लसीकरणाने वेग घेतला आहे. सी. एन. रामदास ट्रस्टचे गिरीश यांनी सांगितले, की योजना सुरू करण्याआधी फक्त ५० ते ६० जणांनीच लस घेतली होती. आता मात्र ६५० पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply