Take a fresh look at your lifestyle.

करोनाने दिलाय असाही झटका; पहा कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाल्याचा काय झालाय दुष्परिणाम

दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी राज्यांनी लॉकडाऊन केला होता. या लॉकडाऊनचा जबरदस्त फटका उद्योग जगताला बसला आहे. या काळात अनेक संकटे आल्याने नुकसान सहन करावे लागले. देशात अनेक राज्यात आजही लॉकडाऊन कायम आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. या काळात वाहतुकीवर निर्बंध आहेत, त्यामुळेही अडचणी निर्माण झाल्या असी मागणी घटली आहे. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केलेल्या सर्वेद्वारे ही माहिती मिळाली आहे.

Advertisement

कोरोनाला रोखायाचे म्हटल्यानंतर लॉकडाऊन करणे गरजेचेच होते. त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. केंद्र सरकारने सुद्धा लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर सोडला होता. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा वाढता धोका पाहता राज्यांनी लॉकडाऊन केले. काही राज्यांनी निर्बंध आधिक कठोर केले. या काळात नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. वाहतुकीवर निर्बंध आले. उद्योग-व्यवसायांच्या अडचणी वाढल्या. याच काळात महागाई भरमसाठ वाढली, आणि अजूनही वाढतच आहे. दुसऱ्या लाटेतील या निर्बंधांचा परिणाम उद्योग जगतावर झाल्याचे या सर्वेत दिसले. देशातील ३४ विविध क्षेत्रात हा सर्वे केला गेला. याद्वारे असे समजले, की जवळपास ७३ टक्के उद्योगांना कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीच्या संकटाचा सामना करावा लागला. पीएचडीसीसीआय संस्थेचे अध्यक्ष संजय अग्रवाल म्हणाले, की लॉकडाऊन काळात वाहतुकीत अडचणी येत आहेत. त्यामुळे वस्तूंचे दर वाढले आहेत. यामुळे कंपन्यांचे कॉस्ट मार्जिन आणि किमतीत मोठी तफावत निर्माण झाली आहे.

Advertisement

कोरोना काळात देशाच्या अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी आणि उद्योग जगतावरील कोरोनाचा परिणाम कमी करण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची आवश्यकता आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. कोरोनाचा धोका पाहता कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. ७३ टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणास प्राधान्य देत असल्याचे सर्वेत म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाने उद्योग जगतच नाही. तर जवळपास सर्वच क्षेत्रांचे मोठे नुकसान केले आहे. आता हे नुकसान भरुन काढण्यासाठी काही वर्षे तरी जाणारच आहेत. त्यामुळे योग्य नियोजन करावे लागणार आहे. कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे भविष्यात आणखी नुकसान होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. सध्या मात्र रुग्णसंख्या कमी होत असल्याने देशातील काही राज्यांनी निर्बंधांत सवलती देण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply