Take a fresh look at your lifestyle.

केजरीवाल सरकारने लसीकरणासाठी केलेय ‘असे’ नियोजन; पहा कुठे मिळणार सर्वांना लस

दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणात आज दिल्ली सरकारने महत्वाचा बदल केला आहे. लसीकरणात सध्या अनेक अडचणी येत आहेत. केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसी मिळत नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांना टाळे लागले आहे. नागरीकांना सुद्धा अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या या अडचणी कमी करण्याच्या उद्देशाने सरकारने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली.

Advertisement

केजरीवाल म्हणाले, की आता दिल्लीत 45 वर्षांच्या पुढील नागरिकांच्या लसीकरणासाठी एक अभियान सुरू केले आहे. जिथे मतदान तिथेच लसीकरण या अभियानांतर्गत पुढील चार आठवड्यात जर लसींची कमतरता झाली नाही तर 45 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.
दिल्लीत आजमितीस 45 वर्षांवरील नागरिकांची संख्या 57 लाख आहे. यातील 27 लाख लोकांना पहिला डोस दिला आहे. आणखी 30 लाख लोकांचे लसीकरण बाकी आहे. सरकारने सध्या जे लसीकरण केंद्र सुरू केले आहेत त्याठिकाणी लोक फारसे येतच नाहीत. त्यामुळे लसी शिल्लक राहत आहेत.

Advertisement

या समस्येवर मात करायची असेल तर आता लोकांच्या घरापर्यंत पोहोचावे लागणार आहे. या अभियानांतर्गत लसीकरणासाठी लोकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे केजरीवाल यांनी सांगितले.

Advertisement

निवडणुकीच्या मतदानावेळी ज्या ठिकाणी मतदानासाठी जाता लसीकरणासाठी सुद्धा त्याच ठिकाणी जा, असे आम्ही लोकांना सांगणार आहोत कारण, या ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था सरकार करणार आहे. पोलिंग स्टेशन शक्यतो जास्त लांब नसतात, पायी जाऊनही येथे सहज पोहोचता येते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. आजपासून दिल्ली शहरातील ७० वॉर्डांमध्ये या अभियानास सुरुवात केली जाणार आहे. तसेच पुढील चार आठवड्यात अभियान पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. या पद्धतीने लसीकरण करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. यामुळे लसीकरणातील अडचणी काही प्रमाणात कमी होतील, असे अपेक्षित आहे. लसींची कमतरता नसेल तर चारच आठवड्यात लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन आहे. राजधानी दिल्लीत साधारण २८० वॉर्ड आहेत. एका आठवड्यात ७० वॉर्ड याप्रमाणे चार आठवड्यात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. सध्या मात्र लसींची कमतरता जाणवत आहे. लसींसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. केंद्राकडून ज्या प्रमाणात लसी मिळतात त्यानुसार लसीकरणाचे नियोजन केले जाते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply