Take a fresh look at your lifestyle.

‘लेबर कोड’ येतोय, पगाराला लागणार कात्री, पण ‘हे’ फायदे पाहून तुम्हीही म्हणाल, ‘चालतंय की..!’

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच एकाच वेळी चार ‘लेबर कोड’ आणत असून, राज्य सरकारांनीही हे कायदे लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होऊ शकतो. या चार ‘लेबर कोड’मध्ये केंद्र सरकारच्या 44 कामगार कायद्यांचा समावेश करण्यात आहे.

Advertisement

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ‘लेबर कोड’बाबत अनेक गोष्टींवर सहमती झाली. 1 एप्रिल 2021 पासूनच हे कायदे लागू होणार होते, परंतु काही मुद्दे अडकल्याने कायद्याची अंमलबजावणी रखडली होती.

Advertisement

‘बेसिक सॅलरी’ (Basic Salary) कमी ठेवण्यासाठी कंपन्या आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे कामगारांना भत्ता देत. त्यामुळे कामगाराच्या ‘पीएफ’मध्ये (Provident fund) कमी पैसे जमा होत. मात्र, नव्या लेबर कोडनुसार, 50 टक्के ग्रॉस सॅलरीवर पीएफ जमा करावा लागेल. त्यामुळे हातात येणारा पगार कमी होईल, मात्र, पीएफ वाढेल.

Advertisement

नव्या लेबर कोडमध्ये ‘इंडस्ट्रिअल रिलेशन कोड’ लागू केला जाईल. त्यात 300 हून अधिक कर्मचारी असल्यास सरकारी परवानगीशिवाय कंपनी बंद करता येणार नाही. सध्या 100 कर्मचारी असणाऱ्या कंपनीवर अशी सक्ती नाही.

Advertisement

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीही ‘लेबर कोड’ (Labour code) लागू असेल. त्यामुळे समान पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळेल, याचीही खात्री असेल. सामाजिक सुरक्षा आणि प्रसूती सुविधेशी संबंधित सर्व 9 कायदे एकामध्ये विलीन केले गेले आहेत.

Advertisement

देशातील व्यवसाय वातावरण सुधारण्यास मदत होईल. ओएसएच कोड अंतर्गत कामगारांचं आरोग्य आणि सुरक्षा रेग्युलेट केलं जाईल. कोणत्याही संस्थेत 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असल्यास त्याठिकाणी हा कोड पाळणं बंधनकारक असेल.

Advertisement

कर्मचाऱ्यांना PF, ESI सारख्या सुविधा मिळाव्यात. एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडून कर्मचारी आला असल्यास, कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगून कंपनी त्या कर्मचाऱ्याचा PF, ESI यासारख्या सुविधा रद्द करू शकत नाही.

Advertisement

कंपनी कर्मचाऱ्यांकडून 15 मिनिटंदेखील ओव्हरटाईम (Overtime) करुन घेत असेल, तर त्या ओव्हरटाईमचे पैसे द्यावे लागतील. आतापर्यंत हे लिमिट 30 मिनिटांचं होतं.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply