Take a fresh look at your lifestyle.

आघाडीचे काही मिटेना.. शिवसेनेनेही दिलाय स्वबळाचा नारा; पहा नेमके काय म्हटलेय संजय राऊत यांनी

पुणे : आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे त्या पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा सूचित केले आहे. त्यावर राष्ट्रवादी शांत आहे, तर शिवसेनेने यावरील आपली चुप्पी सोडली आहे. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची स्वतंत्रपणे लढण्याची तयारी झाली असून महाविकास आघाडीच्या माध्यमातूनही निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीची तयारी असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

पत्रकार परिषदेत राऊत यांनी म्हटले आहे की, आगामी काळातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना बैठका घेत आहे. आमचा पक्ष स्वबळावर आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून अशा दोन्ही पद्धतीने तयारी करीत आहे. सत्ता असेल किंवा नसेल याच्याशी काही देणेघेणे नाही. आमच्या तीन पक्षाचे सरकार एकमेकांचे मतभेद बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर एकत्र आले आहे. पुण्यात तयारी सुरू करण्यात आली असून, इथे शिवसेनेला ८० जागांवर विजय मिळेल.

Advertisement

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला. त्यानंतर पोखरकरांविरोधात बंड करणारे काही सदस्य सहलीवर गेले. या सदस्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांची फूस असल्याचा शिवसेनेचा दावा आहे. त्यांनी पुढे म्हटले की, स्थानिक पातळीवर राजकारण चालू असते. इथेही कुरघोड्या होत असतात. पण त्या कोणत्या स्तरापर्यंत आपण करू शकतो हे ठरवायला नक्कीच पाहिजे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply