Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आकडा पाहून आकडी येईल की; फ़क़्त एक किलो माती पडणार ९ अब्ज डॉलर्सना..!

दिल्ली : परग्रहावर कुठे जीवन अस्तित्वात आहे का, भविष्यात पृथ्वीवर राहणे धोक्याचे ठरले तर कोणता ग्रह राहण्यासाठी योग्य आहे, याचा शोध तर अनेक वर्षांपासून घेतला जात आहे. मात्र, माणसांच्या राहण्यास योग्य असा दुसरा ग्रह मिळालेला नाही, तरी सुद्धा हार न पत्करता अंतराळ संस्था या शोधकार्यात आहेत. अंतराळ मोहिमांसाठी अब्जावधींचा खर्च यासाठीच तर केला जात आहे.

Advertisement

मंगळ आणि शुक्र या दोन ग्रहांवरच जीवसृष्टीचा शोध घेण्याचे सर्वाधिक प्रयत्न होत आहेत. शुक्र ग्रहाचे तापमान फार जास्त आहे, त्यामुळे येथे जीवन असण्याची शक्यता तशी कमीच आहे. तरी देखील शास्त्रज्ञ या ग्रहाचा अभ्यास करत असतात. त्यानंतर मात्र मंगळच असा ग्रह आहे की ज्या ठिकाणी जीवनाचा वेगाने शोध घेतला जात आहे. अमेरिकेसह अन्य काही देशांनी या ग्रहावर यानही पाठवले आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने तर यामध्ये आघाडी घेतली आहे. नासा आता थेट मंगळावरील मातीच पृथ्वीवर घेऊन येणार आहे. नासा मंगळावर गोळा केलेली धूळ आणि माती घेऊन येणार आहे. मंगळावरील माती खूपच महत्वाची आहे. ही माती पृथ्वीवर आणल्यानंतर संशोधन करुन येथे कधी काळी जीवन होते का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नासा तीन मोहिमांद्वारे जवळपास तीन पाऊंड म्हणजेच साधारण एक किलो माती पृथ्वीवर आणणार आहे.

Advertisement

तुम्हास विश्वास बसणार नाही पण मंगळावरील फक्त एक किलो माती आणण्यासाठी नासा या तीन मोहिमांसाठी तब्बल ९ अब्ज डॉलर्स इतका अफाट खर्च करणार आहे. म्हणजेच, नासाच्या दृष्टीने मंगळावरील माती किती महत्वाची आहे, याचा अंदाज आता आला असेलच. नासा पहिल्या मोहिमेत मंगळावरील मातीचे नमुने तपासून एकत्रित करणार आहे. त्यानंतर दुसऱ्या मोहिमेत मातीचे गोळा करुन ते मंगळाच्या कक्षेत लॉन्च करण्यासाठी लॉन्चरमध्ये पॅक करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या मोहिमेत मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. विशेष म्हणजे, नासाने या मोहिमांना सुरुवातही केली आहे. जुलै २०२० मध्येच पहिल्या मोहिमेंतर्गत पर्सिरव्हन्स रोव्हर मंगळावर पाठवण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये हे रोव्हर मंगळावर दाखल झाले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply