Take a fresh look at your lifestyle.

ऑक्सिजन एक्सप्रेसने केली ‘इतकी’ मोठी मदत; पहा कशी, कुठे अन कोणाला झालाय याचा लाभ

दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार उडाला होता. या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढली. लाखो रुग्णांना प्राण गमवावे लागले. ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून हजारो रुग्णांचे प्राण गेले. याचे मुख्य कारण म्हणजे, त्या काळात ऑक्सिजनची मोठी कमतरता होती. राज्यांना मागणी केल्यानंतरही ऑक्सिजन मिळत नव्हता. या मुद्द्यावर न्यायालयानेही केंद्र सरकाराला चांगलेच फटकारले होते.

Advertisement

देशातील ऑक्सिजनची कमतरता पाहता राज्यांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करण्याासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले. विदेशातून ऑक्सिजन मागवण्यात आला. ऑक्सिजनचे उत्पादन वाढवण्यासाठी देशांतर्गत काही ऑक्सिजन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. या काळात रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळणे आवश्यक होते. यासाठी रेल्वेची मदत घेण्यात आली. रेल्वेने ऑक्सिजन एक्सप्रेस तयार केल्या. या एक्सप्रेस द्वारे राज्यांना मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे.

Advertisement

कोरोना महामारीच्या काळात रेल्वेच्या या ऑक्सिजन एक्सप्रेसने आतापर्यंत १५ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांतील ३९ शहरांना २५ हजार ६२९ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. रेल्वेने १५०३ टँकरच्या मदतीने  २५ हजार ६२९ मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा राज्यांना केला आहे. या एक्सप्रेसने आतापर्यंत महाराष्ट्र, उत्तराखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगाणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम या राज्यांना मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे, अशी माहिती भारतीय रेल्वेने शनिवारी दिली.

Advertisement

राज्यांकडून मागणी येत आहे, त्याप्रमाणात रेल्वे या राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. या व्यतिरिक्त या संकटाच्या काळात ओदिशा राज्यानेही देशातील अनेक राज्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे. तसेच या काळात आंतरराष्ट्रीय संस्था, जगातील अनेक देश तसेच खासगी कंपन्या यांनी देशातील ऑक्सिजनची मागणी पाहता ऑक्सिजनची मदत करण्यावर भर दिला होता. या माध्यमातून दुसऱ्या लाटेत देशात अनेक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply