Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. शेती व शेतकऱ्यांवरील ‘हे’ संकट भयंकरच की; पहा काय झालाय नेमका परिणाम

पुणे : शेतीमधील उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेचा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकूणच भाजपच्या सर्व नेत्यांना विसर पडला आहे. एकेकाळी दररोज यावर घसा साफ करणारे भाजपचे नेते या मुद्द्यावर सोयीस्करपाने गप्प झालेले आहेत. त्यामुळे उत्पादनात आणि एकूण शेतीच्या परिस्थितीत बदलाची चाहूल लागण्याच्या बातम्या गायब झालेल्या आहेत. उलट मागील दहा वर्षात शेती आणि शेतकऱ्यांना आणखी एक संकट सतावत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिलेल्या माहितीनुसार असे स्पष्ट झालेले आहे की, पिकांच्या उत्पादकतेत (प्रति हेक्टरी उत्पादन) झपाट्याने घट होत अाहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे तर सोडा उलट कमी होत आहे. दहा वर्षात पिकांची सरासरी उत्पादकता ८.३३ टक्यांनी घटली आहे. त्यातही तेलबीया पिकांची उत्पादकता २१.८५ टक्यांनी तर तृणधान्याची उत्पादकता ३.७८ टक्यांनी घट झाल्याचे याच अहवालातून स्पष्ट होत आहे.

Advertisement
अहवालातील महत्वाचे मुद्दे असे :
कापूस २८.२८ टक्के तर तुरीची उत्पादकता तब्बल २०.९३ टक्यांनी घटली.
१९६०-६१ या काळात कापसाची उत्पादकता ११४ किलाे रुई होती ती २०१०-११ मध्ये ३२२ किलाेपर्यंत वाढली हाेती. ती २०१९-२० मध्ये केवळ २५१ किलाे झाली अाहे.
उसाची उत्पादकता ८८.८५ टनांवरून ८४ टनांवर आली आहे.
तेलबियांची हेक्टरी उत्पादकता १३९४ किलाे हाेती. अाता १,१४४ किलाेवर घसरली आहे.
तृणधान्ये प्रतिहेक्टरी १३७१ किलाेवरून १३२१ किलाेवर आली.
हरबरा पिकाची उत्पादकता २१.२३ टक्यांनी वाढली आहे.
अन्नधान्याची उत्पादकता सरासरी ११८३ किलाेवरून ११५७ किलाे म्हणजे २.२४ टक्के एवढी कमी झाली.

 

Advertisement

एकूण शेतीबाबत आणि त्यामधील शास्त्रीय गोष्टीबाबत सामाजिकदृष्ट्या उदासीनता कायम आहे. उलट दिवसेंदिवस ती वाढत आहे. पारंपारिक, रासायनिक, जैविक, सेंद्रिय, नैसर्गिक, झिरो बजेट, विषमुक्त आणि अशा शेकडो प्रकारच्या शेतीबाबत सध्या सल्ले आणि मार्गदर्शन देण्याचे काम सरकारी आणि खासगी पातळीवर चालू असते. त्यामुळे नेमकी चांगली शेती पद्धती कोणती आणि शाश्वत शेतीचा मार्ग कोणता हेच स्पष्ट होत नाही. त्यातच हवामान बदल, रासायनिक खत आणि पाणी यांचा बेसुमार वापर यासह शेतीसाठी सरकारी पातळीवरून ठोस कृती कार्यक्रम नसल्याचा फटका या क्षेत्राला आणि परिणामी ‘बळीराजा’ला बसत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply