Take a fresh look at your lifestyle.

जगातील 10 पैकी 4 आंबे भारताचे, पण चीनही देतोय टक्कर..! पाहा आपला आंबा चीनमध्ये कसा पोचला..?

मुंबई : आंबा.. फळांचा राजा. उन्हाळा सुरू झाला, की भारतीयांना चाहूल लागते, ती रसरसीत आंब्यांची..! भारत आजही आंबा उत्पादनात अव्वल आहे. म्हणजे, जगातील 10 पैकी 4 आंबे हे भारताचे असतात. भारतातील विविध राज्यांत वेगवेगळ्या जातीचे आंबे पाहायला मिळतात. मात्र, भारतातील या फळांच्या राजाची चीनलाही चटक लागली आहे. आंबा उत्पादनात अव्वल क्रमांक मिळविण्यासाठी चीनची धडपड सुरू आहे. भारताचा आंबा चीनला कसा गेला, आंबा उत्पादन वाढीसाठी चीननं नेमकं काय केलं, चीनशिवाय कोण कोण आंबा उत्पादन घेते, जगाच्या बाजारपेठेत कोणाच्या आंब्याला मागणी आहे, असे जर प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर ही बातमी वाचा..

Advertisement

भारतातील आंब्याला किमान 4 हजार वर्षांचा इतिहास आहे. आंब्याची जन्मभूमीच भारत आहे. भारतातून आजही मोठ्या प्रमाणात परदेशात आंबे पाठवले जातात. आशिया खंडातील अनेक देश भारतीय आंब्यांचीच चव चाखतात. मात्र, भारतानंतर चीनही मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन करतो. आंबा निर्यातीत भारतानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Advertisement

..पण आपला आंबा चीनमध्ये कसा पोहचला, याची गोष्टही फारच रंजक आहे. 1968 मध्ये तत्कालीन पाकिस्तानचे मंत्री सय्यद शरीफुद्दीन पीरदाजा हे ऐन उन्हाळ्यात बीजिंगला गेले होते. सोबत त्यांनी आंब्याच्या 40 पेट्या नेल्या होत्या. तोपर्यंत चीनी नागरिक आंब्यांबाबत अनभिज्ञ होते. सिन्हुआ विश्वविद्यालयात काही मागण्यांसाठी कामगार नेते ठाण मांडून बसले होते. त्यांना कॉम्रेड माओ यांनी हे आंबे पाठवले.

Advertisement

कामगार नेत्यांनी आंब्यांच्या या पेट्या बीजिंगमधील कंपन्यांना पाठविल्या. कंपनीतील प्रत्येक कामगाराला त्यावेळी आंब्याची चव चाखता आली नाही: पण इथूनच खऱ्या अर्थाने चीनमध्ये आंबा नावारुपास आला. चीनी नागरिकांमध्ये माओंच्या प्रेमाचं प्रतिक ठरला.

Advertisement

आंबाउत्पादनाबाबत चीन दुसऱ्या क्रमांकावर
भारत आंब्याची जन्मभूमी असला, तरी आज चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आंबाउत्पादन होतं. सर्वाधिक आंबाउत्पादनाबाबत भारतानंतर चीन दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. अर्थात गुणवत्ता, दर्जाबाबत आजही भारतच आघाडीवर आहे. मात्र, निर्यातीसाठी ज्या प्रमाणात चीनकडे साधने आहेत, तशी भारताकडे नाहीत. आता तर फिलीपाईन्स हा छोटासा देशही भारताला आंबा उत्पादनाबाबत टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

Advertisement

जगात दरवर्षी 5 कोटी टनापेक्षा अधिक आंबाउत्पादन होतं. पैकी केवळ 2 कोटी टन आंबा भारतात पिकतो, तर चीनमध्ये दरवर्षी 50 लाख टन आंबाउत्पादन होते. नंतर थायलंड, इंडोनेशिया आणि मॅक्सिकोचा क्रमांक येतो. म्हणजेच जगातील दर 10 पैकी 4 आंबे हे भारताचे असतात, असे अन्न व कृषी संस्थेची आकडेवारी सांगते.

Advertisement

दरम्यान, कीटकनाशकांच्या अधिक वापरामुळे अमेरिकेने 15 वर्षांपूर्वी भारतीय आंबे आयात करणे बंद केले होते. पण आता हे प्रकरण निकाली निघालं आहे. भारतातील आंब्यांना सर्वाधिक मागणी पश्चिम आशियातून आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply