Take a fresh look at your lifestyle.

ट्विटरवरील ‘ब्लू टिक’ कशी मिळते, ती कधी काढली जाते, जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या ‘ट्विटर हॅण्डल’वरून ‘ब्लू टिक’ हटविल्याने मोठा गोंधळ झाला. अनेकांनी ‘ट्विटर’च्या (Twitter) या निर्णयावर जोरदार टीका केली. त्यानंतर उपरती झालेल्या ‘ट्विटर’ने पुन्हा एकदा नायडू यांच्या ‘ट्विटर’ला ‘ब्लु टिक’ (Blue tick) लावली. ‘ट्विटर’कडून ही ‘ब्लू टिक’ कशी मिळते, ती कधी हटवली जाते, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

सरकार, कंपनी, ब्रँड्स, संघटना, न्यूज संघटना आणि पत्रकार, मनोरंजन, स्पोर्ट्स, गेमिंग अॅक्टिविस्ट, ऑर्गनाजर्स आणि प्रभावशाली व्यक्तींसाठी ‘ट्विटर’ने ‘ब्लू टिक’ कॅटेगरी बनवली आहे. शिवाय ‘ब्लू टिक’साठी तुमचे ‘अकाउंट’ खरे (Authentic) असायला हवे, ते सतत ‘अॅक्टिव’ हवे.

Advertisement

कशी मिळते ‘ब्लू टिक’..?
‘ब्लू टिक’ मिळवण्यासाठी तुम्हाला ‘ट्विटर अकाउंट’च्या सेटिंगमध्ये जावे लागेल. तेथे ‘रिक्वेस्ट व्हेरिफिकेशन’ (Request Verification) वर क्लिक करा. तुम्हाला कोणत्या कॅटेगरीत ‘ब्लू टिक’ हवी, याची निवड करा. ओळख सांगण्यासाठी आयडी कार्ड, ई-मेल अॅड्रेस किंवा अधिकृत वेबसाइटची लिंक द्यावी लागते.

Advertisement

खूप दिवस जर तुम्ही ‘अकाउंट’ ओपन केले नसेल, तर ‘ब्लू टिक’ हटवली जाते. कंपनीकडून त्यासाठी कोणतीही नोटिस येत नाही. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी 23 जुलै 2020 रोजी अखेरचे ट्विट केले होते. म्हणजेच बऱ्याच दिवसापासून त्यांचे ‘ट्विटर अकाउंट’ ऍक्टिव्ह नव्हते. त्यामुळेच कदाचित ही कारवाई केली असावी.

Advertisement

सरकारी पदावर असताना ‘अकाउंट व्हेरिफाय’ केले असेल, तर पद सोडल्यानंतर ही ‘टिक’ हटवली जाऊ शकते. तसेच तुमचे अकाउंट वारंवार नियमांचे उल्लंघन करीत असेल, तर ‘ब्लू टिक’ हटवली जाऊ शकते. वारंवार नाव, बायो किंवा प्रोफाइल फोटो बदलून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास ‘ट्विटर’ ही कारवाई करू शकते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply