Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. वाईट पण तरीही आशादायक की; म्हणून ‘त्या’ ठिकाणी टी-20 वर्ल्डकपचे सामने होण्याची शक्यता..!

मुंबई : यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपचे आयोजन भारताबाहेरच करण्याची तयारी सुरू झालेली आहे. भारताला याचे यजमानपद मिळाले असतानाही  भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) आयसीसीला सांगितले की, जर आयोजनाचे अधिकार त्यांच्याचकडे राहिले तर स्पर्धा बाहेर घेण्यास त्यांची हरकत नाही.

Advertisement

स्पर्धा यूएईतील तीन शहरे, अबुधाबी, दुबई व शारजासह अोमानची राजधानी मस्कतमध्ये होऊ शकते. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली नाही. तरी सूत्रांनी सांगितले आहे की, आयोजनाचा निर्णय घेण्यासाठी २८ जूनपर्यंतची वेळ मिळाली आहे. स्पर्धा देशाबाहेर हलवण्यास तयार असून आयसीसीला सांगितले आहे.

Advertisement

स्पर्धेत १६ संघ सहभागी होतील. आधीचे सामने मस्कतला होऊ शकतात. जर आयपीएल १० ऑक्टोबरला संपली तर यूएईत टी- २० सामने नोव्हेंबरमध्ये सुरू होऊ शकतील. यामुळे पिच तयार करायला तीन आठवड्यांचा वेळ मिळेल. ओमाननेही म्हटले आहे की, ते आयोजनासाठी तयार आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply