Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘तिथे’ लसटंचाईने सगळेच त्रस्त; पहा कुठे पैसे देऊनही मिळेना करोनाची लस

दिल्ली : केंद्र सरकार राज्यांकडे कोरोना प्रतिबंधक लसी शिल्लक असल्याचा कितीही दावा करत असले तरी राज्यांत मात्र परिस्थिती काही वेगळीच आहे. राज्यांना पुरेशा लसी मिळत नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. राजधानी दिल्लीत सध्या लसींची कमतरता असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांना टाळे आहे. त्यानंतर आता राजस्थानातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. लसी शिल्लक नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद करण्यात आले आहे.

Advertisement

राज्यातील ३३ जिल्ह्यांत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेले सर्व सरकारी लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्याचे राज्य सरकारने सांगितले. विशेष म्हणजे, लसींचे पैसे दिल्यानंतरही लसी मिळत नसल्याचा दावा केला आहे. कोरोना प्रतिबंधक लसी खरेदी करण्यासाठी सरकारने लस उत्पादक कंपन्यांना शंभर कोटी रुपये आगाऊ दिले आहेत. पैसे दिल्यानंतरही कंपन्या मात्र लस देत नाहीत, असे राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यासाठी सुद्धा केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

देशात अनेक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा कमी झाला आहे. असे असले तरी धोका मात्र टळलेला नाही. त्यातच आता तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. या लाटेस रोखायचे असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जास्तीत लोकांचे लसीकरण करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांनीही सांगितले आहे. मात्र, ज्यावेळी लसींची गरज आहे नेमक्या त्याच वेळी लसींची कमतरता निर्माण झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. लसी वेळेत मिळाल्या नाहीत तर या अडचणी आणखी वाढणार आहेत.

Advertisement

देशात सध्या लसीकरण वेगाने होणे गरजेचे आहे. देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत फक्त ३.३ टक्के लोकांचे लसीकरण झाले आहे. लसी मिळत नसल्याने लसीकरणाचा वेग सुद्धा खूप कमी झाला आहे. त्यामुळे राज्यांना वारंवार लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. दुसरीकडे मात्र केंद्र सरकार मात्र राज्यांकडे दोन कोटींच्या आसपास लसी शिल्लक असल्याचा दावा करत आहे. लसी जर शिल्लक असतील तर मग राज्यांना लसीकरण केंद्र का बंद ठेवावी लागत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाचे उत्तर मिळाले नसले तरी देशात काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद राहत असल्याने राज्यांकडे लसी नसल्याचे दिसत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply