Take a fresh look at your lifestyle.

वडेट्टीवारांच्या घोषणा गोंधळावर पहा मुख्यमंत्र्यांनी नेमके काय म्हटलेय..!

मुंबई : राज्यात अनलॉकच्या निर्णयावर गेले दोन दिवस चांगलाच गोंधळ सुरू होता. त्यानंतर शुक्रवारी राज्य सरकारने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर गोंधळ मिटला. मात्र, या मुद्द्यावर विरोधकांनी राज्य सरकावर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या मंत्र्यांनाही स्पष्टीकरण द्यावे लागले. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच यावर भाष्य केले आहे. अनलॉकबाबत हा गोंधळ कसा झाला, याची माहिती दिली. तसेच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचीही पाठराखण केली. लोकसत्तातर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी स्पष्टीकरण दिले.

Advertisement

मुख्यमंत्री म्हणाले, की आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर निकष ठरवले पाहिजेत, असे मत व्यक्त करण्यात आले. याच दरम्यान वडेट्टीवार यांचा गैरसमज झाला की निकष ठरवून निर्णय जाहीर करत आहोत. त्यानुसार त्यांनी निर्णय जाहीर केला, यात त्यांची काहीही चूक नाही. परवा वडेट्टीवार यांनी जे निकष जाहीर केले होते, तेच नंतर जाहीर करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement

याआधी मात्र या निर्णयावरुन चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत अनलॉकचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर थोड्याच वेळात स्पष्टीकरण देत अनलॉकचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे राज्य सरकारने सांगितले. त्यामुळे या निर्णयाबाबत नागरिकांत संभ्रम निर्माण झाला. तर दुसरीकडे विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली. विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. दोन दिवसांनंतर मात्र काल शुक्रवारी राज्य अनलॉकबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली. याद्वारे राज्यात अनलॉकचा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

या निर्णयानुसार राज्यात ७ जूनपासून पाच टप्प्यात अनलॉक होणार आहे. या पाच टप्प्यात काय निकष आहेत. कोणत्या जिल्ह्यांचा कोणत्या टप्प्यात समावेश केला आहे, तसेच कोणत्या टप्प्यात काय सुरू राहणार काय बंद राहणार याचीही माहिती दिली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. राज्यात दुसरी लाट ओसरत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. राज्यात मात्र कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. आता तर तिसरी लाट येणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply