Take a fresh look at your lifestyle.

भारत-चीन वादात पहा रशिया कोणाच्या बाजूने; पुतीन यांनी व्यक्त केले तणावावर भाष्य

दिल्ली : राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. याचा प्रत्यय अनेक वेळा आला आहे. आताही भारताचा मित्र असलेल्या रशियाने असे भारत आणि चीन बाबत महत्वाचे वक्तव्य करत अमेरिकेला इशारा दिला आहे.

Advertisement

तसे पाहिले तर, रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. संकटाच्या काळात या देशाने भारतास अनेक वेळा मदतही केली आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी करत असतो. असे असले तरी भारत आणि अमेरिकेत सहकार्य वाढत असतानाही रशियाने फारसे लक्ष दिले नाही आणि या वरून दोन्ही देशात कधी तणाव सुद्धा निर्माण झाला नाही. मात्र राजकारणात कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. काही दिवसांपासून रशिया आणि पाकिस्तान यांच्यात सहकार्य वाढले आहे. रशियाने या देशात गुंतवणूक करणार असल्याचेही म्हंटले आहे. तर दुसरीकडे रशिया आणि चीन यांच्यातील वैमनस्य कमी होत आहे. या दोन्ही देशांनी वादाच्या गोष्टी टाळून संबंध सुधारण्यावर भर दिला आहे. त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.

Advertisement

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावावर भाष्य केले आहे आणि या माध्यमातून अमेरिकेला सुद्धा इशारा दिला आहे. पुतीन म्हणाले, की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सुज्ञ नेते आहेत. भारत आणि चीनमधील वाद सोडवण्याची क्षमता या दोन्ही नेत्यांमध्ये आहे. पिटीआय वृत्तसंस्थेने पुतीन यांची मुलाखत घेतली, या मुलाखतीत पुतीन यांनी हे वक्तव्य केले. पुतीन पुढे म्हणाले, की भारत आणि चीनमध्ये काही अडचणी आहेत, हे मला माहीत आहे. तसे पाहिले तर शेजारी देशांमध्ये नेहमीच काहीतरी वाद असतातच. भारताचे पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग या दोघांचेही स्वभाव मला माहित आहेत, हे दोन्ही नेते अतिशय सूज्ञ आहेत, त्यामुळे त्यांच्यात जे काही वाद असतील त्यावर ते तोडगा काढतील. इतर कोणीही त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे मला वाटते.

Advertisement

या वक्तवावरून पुतीन यांनी एक प्रकारे अमेरिकेला इशारा दिल्याचे मानले जात आहे. भारत आणि चीनच्या वादात अमेरिकेने अनेक वेळा प्रतिक्रिया दिली आहे. या मुद्द्यावर चीनला लक्ष्य केले आहे. आता मात्र पुतीन यांनी या दोन्ही देशांच्या वादात आणखी कुणी हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे म्हंटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply