Take a fresh look at your lifestyle.

आणि पारनेरमध्ये बनावट बियाणे पकडले; पहा कोणत्या कंपनीचे आहे हे बियाणे

अहमदनगर : खरीप आणि रब्बीच्या सीजनमध्ये कृषी विभागाच्या संगनमताने किंवा त्यांनाही वाकुल्या दाखवत प्रतिवर्षी हजारो टन बियाणे, खत आणि कीटकनाशक यांची राजरोस विक्री केली जाते. आताही खरिपाच्या तोंडावर पारनेर तालुक्यात एका कंपनीचे बनावट बियाणे पकडण्यात आलेले आहे. मात्र, हे फ़क़्त हिमनगाचे टोक असून आणखी किती मोठ्या प्रमाणावर असा शेतकरी फसवणुकीचा उद्योग चालू असेल अशीच शंका यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

Advertisement

पंचायत समितीचे कृषी अधिकारी बळीबा उघडे यांना पारनेर बसस्थानकासमोर, डॉ. आंबेडकर चौकात बियाण्याची मालमोटार संशयस्पदरीत्या उभी असल्याच्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. झडती घेतली असता मोटारीत पटेल सिडस् कॉर्पोरेशन, जालौन, उत्तरप्रदेश या कंपनीचे ६ टन बनावट वाटाण्याचे बियाणे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ४० किलो वजनाच्या १५० गोण्यांमध्ये असलेल्या या बनावट वाटाण्याच्या बियाण्याची किंमत ६ लाख रूपये असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

Advertisement

कंपनीकडे राज्याच्या कृषी संचलनालयाचा बियाणे विक्रीचा परवाना नसल्याची बाब पथकाच्या निदर्शनास आलेली आहे. कृषी विभागाच्या पथकाने मोटार चालकासह आणखी एका व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्यांच्याकडे चौकशी चालू आहे. पारनेर शहर अथवा तालुक्यात बनावट बियाणे मागवणारा व्यापारी कोण, हाच मुद्दा या चौकशीतून पुढे येत नसल्याचे राजकीयदृष्ट्याही चर्चेला उधान आलेले आहे. पोलिसांच्या चौकशीत मोटार चालकाचे नाव जीत शर्मा असल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी सांगितले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply