Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘त्या’ पासपोर्ट पॉलिसीवर भारताने घेतलाय तीव्र आक्षेप; पहा नेमके काय आहे प्रकरण

दिल्ली : जगात विकसित म्हणवल्या जाणाऱ्या देशांनी कोरोना विषाणूवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. युरोपातील देशांमध्ये लसीकरणाचा वेग जास्त असल्याने येथेही कोरोना आटोक्यात येत आहे. त्यामुळे या देशांनी निर्बंध कमी केले आहेत. देशातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यानंतर आता या देशांनी ‘वैक्सिन पासपोर्ट’ चा प्रस्ताव समोर ठेवला आहे.

Advertisement

या प्रस्तावास मात्र भारताने तीव्र विरोध केला आहे. ‘वैक्सिन पासपोर्ट’ हा मुळातच भेदभावजनक आहे. विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशात लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर केला तर विकसनशील देशांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे भारताने यास नुकत्याच पार पडलेल्या जी ७ मंत्रीस्तरीय बैठकीत विरोध केला. या बैठकीस केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. हर्षवर्धन यांनी सांगितले, की पासपोर्ट बंधनकारक करणे आजिबात योग्य ठरणार नाही, अशा प्रकारचा निर्णय भेदभावपूर्ण ठरू शकतो. याचे कारण म्हणजे, विकसित देशांच्या तुलनेत विकसनशील देशांत लसीकरणाचे प्रमाण आजही खूप कमी आहे. त्यामुळे अशा स्थितीत या प्रकारचा कोणताही निर्णय नुकसान करणाराच ठरू शकतो.

Advertisement

कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका असल्याने अनेक देशांनी दुसऱ्या देशांतील नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध टाकले आहेत. तर, ज्या देशांत असे निर्बंध नाहीत अशा देशात अन्य देशांतील नागरिक गेले तर त्यांना बरेच दिवस क्वारंटाइनमध्ये रहावे लागते. अशा परिस्थितीत जर वैक्सिन पासपोर्ट बंधनकारक केला तर प्रवाशांना क्वारंटाइनच्या नियमात सवलती मिळतील. मात्र, यासाठी नागरिकांना लस घ्यावी लागेल, आणि विकसनशील देशांत लसीकरणाची स्थिती पाहता त्यांना लसीसाठी बराच काळ थांबावे लागेल. म्हणजेच, त्यांना पुढे परदेशात जाण्यासही उशीर होईल. अशा अडचणी येणार आहेत. त्यामुळेच भारताने पासपोर्टच्या या प्रस्तावास जोरदार विरोध केला आहे.

Advertisement

दरम्यान, भारताचा विचार केला तर देशात लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. आतापर्यंत १८ कोटी १६ लाख ७८ हजार ७४४ लोकांनाच पहिला डोस तर ४ कोटी ५८ लाख ८९ हजार लोकांना दुसरा डोस दिला आहे. देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर हे प्रमाण फक्त ३.३ टक्के इतके आहे. अजून कोट्यावधी नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. या लसीकरणासाठी काही काळ जाणार आहे. अशा परिस्थितीत जर युरोपीय देशांच्या या वैक्सिन पासपोर्टला मंजुरी मिळाली तर देशास या निर्णयाचा फटका बसणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply