Take a fresh look at your lifestyle.

धन धना धन..! सरकारी तिजोरी मालामाल, ‘जीएसटी कलेक्शन’मधून किती कमाई झाली पहा..?

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे खिळखिळ्या झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देणारी बातमी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आले. असे असतानाही वस्तू व सेवा करातून (जीएसटी कलेक्शन) सरकारी तिजोरी मालामाल झाली आहे. सलग आठवा महिन्यात जीएसटी कलेक्शनने (GST collection) 1 लाख कोटींचा टप्पा पार केला. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हे चांगले संकेत आहेत.

Advertisement

जीएसटी कलेक्शनमधून मे महिन्यात सरकारच्या तिजोरीत 1 लाख 2 हजार 709 कोटी रुपये जमा झाले. मे 2021 मध्ये वार्षिक आधारावर एकूण जीएसटीमध्ये 65 टक्के वाढ झाली आहे.

Advertisement

असे आले पैसे..
केंद्रीय जीएसटी- 17592 कोटी
राज्य जीएसटी – 22653 कोटी
आंतर जीएसटी – 53199 कोटी
आयात वस्तूंच्या माध्यमातून आंतर जीएसटी – 26002 कोटी
सेसकडून – 9265 कोटी. सेसमधून 868 कोटींचा उपकर आयात वस्तूंच्या माध्यमातून आला.

Advertisement

जीएसटी कलेक्शनने सलग आठवा महिन्यात 1 लाख कोटींचा टप्पा पार केला. मे महिन्यात सरकारने 15014 कोटी सीजीएसटी आणि 11653 कोटी ‘एसजीएसटी’ची (SGST) नियमित ‘सेटलमेंट’ (Settlement) केली आहे. वस्तूंच्या आयात वाढीमुळे महसुलात 56 टक्क्यांनी वाढ झाली. देशांतर्गत व्यवहारांमध्ये वर्षाकाठी 69 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

रिटर्न भरण्याच्या नियमात सरकारनेही काही बदल केले आहेत. त्यानुसार, ज्यांची वार्षिक उलाढाल 5 कोटींपेक्षा जास्त आहे, ते आता पुढील महिन्याच्या 4 तारखेपर्यंत रिटर्न भरू शकतात. ज्यांची उलाढाल 5 कोटींपेक्षा कमी आहे, ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विलंब शुल्क न देता परतावा दाखल करू शकतात. अशा परिस्थितीत मे महिन्यासाठी निव्वळ जीएसटी संकलन यापेक्षा अधिक होईल, अशी अपेक्षा होती.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply