Take a fresh look at your lifestyle.

उठा, लागा कामाला..! आरबीआयचा छोट्या उद्योगांना मदतीचा हात, पाहा काय घोषणा केलीय..?

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लघु उद्योजकांवर झाला. छोटे-मोठे उद्योग डबघाईला आले. अशा उद्योगांच्या मदतीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया धावून आली आहे. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या संपर्क संवेदन क्षेत्र (contact-intensive sectors) साठी ‘आरबीआय’ने मोठी घोषणा केली आहे.

Advertisement

‘आरबीआय’ने या क्षेत्रासाठी 15 हजार कोटींची ‘ऑन-टॅप लिक्विडिटी’ सुरु केली आहे. यामुळे रेस्टॉरंट, बस ऑपरेटर्स, पर्यटन क्षेत्र, ब्यूटी पार्लर आणि विमानसेवांना अतिरिक्त कर्ज मिळणार आहे. ‘आरबीआय’च्या या निर्णयामुळे या क्षेत्रांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँकेने 2021 मधील तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक धोरण नुकतेच जाहीर केले. ‘आरबीआय’चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या वेळी ‘संपर्क संवेदन क्षेत्रा’साठी मोठी घोषणा केली. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्यांना कर्जाची सुविधा मिळणार आहे.

Advertisement

‘लिक्विडिटी’चे समान वितरण करण्याचे रिझर्व्ह बँकेचे धोरण आहे. या क्षेत्रात आतापर्यंत 36,545 कोटी रुपयांची तरलता (liquidity) देण्यात आली होती. शासकीय सिक्युरिटीज 1.0 (G-Sec) अंतर्गत 40,000 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज खरेदी करण्यासाठी एक मोहीमही सुरु करण्यात आली होती.

Advertisement

नव्या आर्थिक धोरणाची घोषणा करताना शक्तिकांत दास यांच्या माहितीनुसार, 15,000 कोटी रुपयांसाठी येत्या 31 मार्च 2022 पर्यंत एक वेगळी ‘लिक्विडीट विंडो’ उघडली जाईल. ज्यात रेपो दरावर तीन वर्षांची मुदत असेल.

Advertisement

बँका, हॉटेल आणि रेस्टॉरंट्स, टुरिझम – ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, अ‍ॅडव्हेंचर अँड हेरिटेज फॅसिलिटीज, एव्हिएशन एंन्सिलरी सर्व्हिसेस – ग्राउंड हँडलिंग अँड सप्लाय चेन, बस ऑपरेटर, कार रिपेयर सर्व्हिसेस यासारख्या इतर सेवांचा या योजनेत समावेश असेल, तसेच रेंट -अ-कार सर्विस प्रोवायडर्स, इव्हेंट आयोजक, स्पा क्लिनिक, ब्युटी पार्लर आणि सलून यांनाही नवीन कर्ज मिळू शकते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply