Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या डोकेदुखीत वाढ; पगा कसा फटका बसलाय एकूण देशालाच..!

दिल्ली : कोरोनाच्या दृष्टचक्रात अवघे जगच भरडले गेले आहे. आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल अशी संकटे या घातक विषाणूने आणली. या संकटांचा असा जबरदस्त फटका देशास बसला आहे. देशाची अर्थव्यवस्था कोलमडली, लाखो लोक बेरोजगार झाले, उद्योग-व्यवसायांना टाळे लागले. देशांतर्गत व्यापाराचे कोट्यावधींचे नुकसान झाले, अशी संकटे असताना आता सराकारच्या डोकेदुखीत वाढ करणारी बातमी आली आहे.

Advertisement

कोरोनाचे संकट कायम असतानाही जीएसटीच्या वसुलीवर परिणाम झाला नव्हता. जीएसटी वसुलीचे आकडे दर महिन्यास नवीन रेकॉर्ड तयार करत होते. आता मात्र या वसुली एक्सप्रेसला ब्रेक लागला आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात जीएसटीचे संकलन घटले आहे. मे महिन्यात १ लाख २ हजार ७०९ कोटी रुपये जीएसटी कलेक्शन झाले आहे. एप्रिल महिन्यात हा आकडा १ लाख ४१ हजार ३८४ कोटी रुपये इतका होता. कोरोनाच्या संकटाचा परिणाम जीएसटीवर झाला आहे. त्यामुळे संकलन घटले आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी राज्यांनी लॉकडाऊन केला होता. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे. देशांतर्गत व्यापाराचे जवळपास १२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बेरोजगारीचा दर वाढला आहे. गरीबी वाढली आहे. ९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. उद्योग-व्यवसायांचे मोठे नुकसान झाले. रियल इस्टेट, मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रासरही मोठा फटका बसला आहे. या काळात राज्यांचे महसूल घटले. त्याचा परिणाम जीएसटीवरही झाला आहे. मागील काही महिन्यांच्या तुलनेत मे महिन्यात कमी जीएसटी मिळाला आहे.

Advertisement

वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात १ लाख २ हजार ७०९ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. यामध्ये सीजीएसटी १७ हजार ५९२ कोटी रुपये, एसजीएसटी २२ हजार ६५३ कोटी रुपये तर आयजीएसटी ५३ हजार १९९ रुपये आणि सेस ९ हजार २६५ कोटी रुपये याप्रमाणे जीएसटीचे संकलन झाले आहे, अशी माहिती वित्त मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांचा विचार केला तर एप्रिल महिन्यात जीएसटी वसुली वाढली होती. या एकाच महिन्यात जीएसटीच्या रुपाने १.४१ लाख कोटी रुपये मिळाले. तर मार्चमध्ये १ लाख २३ हजार कोटी, फेब्रुवारीमध्ये १ लाख १३ हजार कोटी आणि जानेवारी महिन्यात १ लाख २० हजार कोटी रुपये इतके जीएसटीचे संकलन झाले होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply