Take a fresh look at your lifestyle.

‘मोदींचे मंत्रीमंडळ व भाजपही फ़क़्त हेडलाइन केंद्री..’; पहा नेमके असे कोणी म्हटलेय

मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसीकरणावरुन केंद्र आणि राज्य सरकारांतील वाद वाढतच चालला आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही तेथे तर हा वाद जास्तच तीव्र आहे. कोरोना लस किती आहेत, राज्यांना पुरेशा लसी का मिळत नाहीत, लसीकरणाचे फसलेले नियोजन अशा अनेक मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दोन्ही सरकारे दाव्यावर ठाम आहेत, त्यामुळे हा वाद मिटण्याची चिन्हे नाहीत.

Advertisement

केंद्र सरकारच्या या कारभारावर विरोधी पक्ष टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, की ‘पंतप्रधान मोदी कोरोनाच्या प्रश्नावर बैठका घेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, किती लसी उपलब्ध होतील, असे नुसतेच म्हणून काय उपयोग, त्यासाठी केंद्र सरकारने अहवाल तयार करुन जनतेसमोर ठेवला पाहिजे.’ ‘केंद्र सरकार लसींबाबत अजूनही स्पष्ट माहिती देत नाही. राज्यांना लस पुरवठा कसा केला जाणार आहे, राज्यांना किती लसी मिळणार, केंद्र सरकार किती लसी खरेदी करणार आहे, याची माहिती मिळाली पाहिजे. मात्र, याबाबत माहिती दिली जात नाही. भाजपचे नेते सुद्धा वेगळेच वक्तव्य करत असतात, हे लोक फक्त हेडलाइन होण्यासाठी बोलत असतात,’ असा आरोप त्यांनी केला.

Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारने आता लसीकरणावर भर दिला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. या बैठकीत कोरोना लसी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याचे सांगितले. सध्या आपणास  लसीचा प्रत्येक डोस महत्वाचा आहे. त्यामुळे लसींचे नुकसान टाळण्यासाठी राज्यांनी ठोस निर्णय घ्यावेत, असे आदेश त्यांनी दिले. या मुद्द्यावर आधीच केंद्र आणि राज्यय सरकार यांच्यात वाद सुरू आहेत. त्यानंतर आता पंतप्रधानांनी सुद्धा राज्यांना जबाबदार धरल्याने वाद वाढणार आहे. याआधी छत्तीसगड राज्याने केंद्र सरकारच्या यादीवर आक्षेप घेत टीका केली होती. एक तर केंद्र सरकार लसींची माहिती थेट लसीकरण केंद्रांवरुन घेत आहे. एखाद्या केंद्राकडून वेळेत माहिती मिळाली नाही तर तेथे लसी वाया गेल्याचे सरकार म्हणत आहे, हे योग्य नाही, असे छत्तीसगडच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. केंद्र सरकारला जर आमच्यावर विश्वासच नसेल तर त्यांनी केंद्राचे एखादे पथक राज्यात पाठवावे, असे ते म्हणाले होते. बाकीचे राज्येही अशाच प्रकारे केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply