Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण व राजकारणावर भाजप खासदार निंबाळकरांनी छत्रपतींना केले ‘हे’ आवाहन..!

सोलपुर : मराठा आरक्षण रद्द करण्याचा न्यायालयीन निकाल लागल्याने राज्याचा महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका बसला आहे. त्याचाच फायदा घेऊन मराठा आरक्षण आणि करोनाच्या निमित्ताने राज्यात सत्तापालट करण्यासाठी विरोधी पक्ष असलेला भाजप सक्रीय झालेला आहे. मात्र, खासदार संभाजीराजे भोसले यांनी आरक्षण प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतली आहे. त्याचवेळी त्यांच्या नव्या राजकीय पक्षाच्या चर्चाही पुढे येत आहेत. त्यावरून खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

Advertisement

पंढरपुरात त्यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षण प्रश्नावर छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला असून रायगडावरून ६ जून रोजी पुढील भूमिका जाहीर करण्याची घोषणा केली आहे. यामुळे गडावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून त्यांची आडवणूक होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी त्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याच्या बातम्या येत आहेत. स्वतंत्र पक्ष काढण्याबाबतही चर्चा कानावर येत असली तरी छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर भरकटू नये.

Advertisement

मराठा आरक्षणबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे. आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडी सरकारमधील नेते केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देऊन उच्च न्यायालयातही टिकवले. मग आता या सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्याची जबाबदारी केंद्राची नसून राज्य सरकारचीच असल्याचे खासदार निंबाळकर यांनी म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply