Take a fresh look at your lifestyle.

स्लॅब कोसळला तसे आघाडीसुद्धा कधीही कोसळेल; पहा भाजपने नेमके काय भाकीत व्यक्त केलेय ते

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तसे सरकार फार काळ टिकणार नाही. तीन पक्षांचे सरकार अंतर्गत वादांमुळे आपोआप पडेल, अशा बातम्या अनेकदा आल्या. सरकार पडण्याच्या चर्चा अजूनही सुरुच आहेत. मात्र, सरकार अद्याप टिकून आहे. महाविकास आघाडी सरकारला कसलाच धोका नाही, असा दावा सत्ताधारी करत असतात.

Advertisement

आता पुन्हा भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला तसे राज्यातील आघाडी कधीही कोसळेल, असा दावा केला आहे. अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला तरी सरकारला माहिती मिळत नाही. तसेच हे सरकार कधी कोसळेल, ते कळणारही नाही. दरेकर यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता पुन्हा राजकीय विश्वात या चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारच्या अनलॉकच्या निर्णयावरही त्यांनी काही मुद्दे मांडले. दरेकर म्हणाले, की राज्य सरकारने अनलॉकचे परिपत्रक काढले आहे. मात्र, त्यामध्ये जिल्ह्याबाबत निकष दिसत नाहीत.

Advertisement

दरम्यान, राज्य सरकार पडणार असल्याचे दावे विरोधी पक्षांकडून सातत्याने केले जात आहे. याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सध्या कोविडचे संकट असल्याने याकडे लक्ष दिले नाही. कोरोनाचे संकट गेल्यानंतर बघू असे विधान केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार टीका केली होती. कितीही दावे केले तरी सत्ता येत नसल्याने भाजपचे नेते हताश झाले आहेत. दुसऱ्या पक्षातून आलेले आमदार पुन्हा स्वगृही परततील, अशी भिती भाजपला वाटत असल्याने त्यांचे नेते सरकार लवकरच पडणार असल्याचे सांगत असतात. मात्र, महाविकास आघाडी सरकारला कसलाच धोका नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

Advertisement

तरीही या चर्चा अजूनही सुरुच आहेत. भाजपचे नेते हा मुद्दा उपस्थित करत असतात. राज्यात मध्यंतरी ज्या काही घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी घटक पक्षात समन्वय नसल्याचे दिसून आले. अनलॉकच्या निर्णयावर तर मोठा गोंधळ उडाला होता. तसेच काँग्रेस नाराज असल्याच्याही बातम्या होत्या. याचा अंदाज आल्यानेच विरोधकांनी पुन्हा सरकार पडणार असल्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply