Take a fresh look at your lifestyle.

कमाईची संधी.! एलआयसीचा ‘मेगा आयपीओ’ येतोय, पाहा तुमचा कसा होणार फायदा..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे आर्थिक संकटात आलेल्या मोदी सरकारने एलआयसीच्या (भारतीय जीवन विमा निगम) समभागांची विक्री करण्याची घोषणा केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21चं बजेट सादर करतानाच ‘एलआयसी’च्या (LIC) ‘आयपीओ’ची घोषणा केली होती. त्यावरून मोदी सरकारला विरोधी पक्षांच्या टीकेला सामोरं जावं लागत असलं, तरी सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहे.

Advertisement

सध्या ‘एलआयसी’चा ‘मेगा आयपीओ’ (Mega IPO) प्रस्तावित आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. केंद्र सरकार जूनमध्येच ‘इन्व्हेस्टमेंट बँकर्स’कडून (Investment Bankers) प्रस्ताव मागवण्याची शक्यता आहे. या प्रस्तावांच्या आधारे ‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’च्या संचलनासाठी ‘इन्व्हेस्टमेंट बँकर्स’ची नियुक्ती केली जाणार आहे.

Advertisement

‘एलआयसी’च्या शेअर्सच्या (Shares) विक्रीसाठी सरकार लवकरच आमंत्रण पाठवू शकतं. त्यानुसार मार्च-2022 पर्यंत ‘एलआयसी’चा ‘आयपीओ’ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘एलआयसी’सह एअर इंडिया (Air India) आणि बीपीसीएल (BPCL) कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीच्या (Disinvestment) दृष्टीनेही केंद्र सरकार लवकरच पावलं उचलणार असल्याची अपेक्षा आहे.

Advertisement

केंद्र सरकार महत्त्वाकांक्षी निर्गुंतवणूक योजनेद्वारे 24 अब्ज डॉलर निधी उभा करणार आहे. ‘एलआयसी’च्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, 2019-20मध्ये ‘एलआयसी’ची एकूण अनुमानित संपत्ती 32 लाख कोटी रुपये अर्थात 439 अब्ज डॉलर एवढी आहे. भारतीय बाजारपेठेत ‘एलआयसी’चा हिस्सा जवळपास 70 टक्के आहे.

Advertisement

दरम्यान, एलआयसीच्या जीवनशांती (Jeevan Shanti) योजनेद्वारे दर महिन्याला पेन्शन मिळण्याचा पर्याय मिळाला आहे. त्यामुळे हातात अचानक मोठी रक्कम आली असेल, तर ती एकरकमी या योजनेत गुंतवून नंतर दर महिन्याला पेन्शन स्वरूपात पैसे मिळवता येतील.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply