Take a fresh look at your lifestyle.

कांदा लिलाव : अखेर नियमांसह ‘कृषीसाधना’चाच विजय; मिळाली खरेदीला परवानगी..!

नाशिक : कांदा लिलावात पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यात लासलगाव आणि इतर मार्केट कमिटीमध्ये महिलांच्या कृषीसाधना महिला सहकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे. लासलगाव येथील व्यापाऱ्यांनी त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरीस नियम आणि शेतकऱ्यांचा दबाव लक्षात घेऊन त्यातही महिलांचा विजय झाला आहे. खरेदीस परवानगी मिळाल्याने महिला संस्थेच्या सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement

नाफेडतर्फे कांदा खरेदीची मान्यता मिळालेली कृषीसाधना महिला सहकारी संस्था लिलावात उतरल्यानंतर व्यापाऱ्यांच्या बहिष्काराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज ठप्प झालेले होते. सभापती सुवर्णा जगताप यांच्या मध्यस्थीनंतर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव शुक्रवारी दुपारनंतर सुरू झाले. कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर आपल्याला मनाई केल्याने संस्थेची मानहानी व शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया कृषीसाधना संस्थेच्या संचालिका साधना जाधव यांनी यानिमित्ताने दिली आहे.

Advertisement

बाजार समितीचा अडत्याचा परवाना व नाफेडसाठी खरेदीचे काम मिळालेल्या कृषीसाधना महिला सहकारी संस्थेस लासलगाव व्यापारी असोसिएशनने खरेदीसाठी असोसिएशनचे सभासदत्व नसल्याचे कारण देऊन लिलावावर बहिष्कार टाकला होता. लासलगावमधील परवानाधारकांच्या संख्येत महिलांच्या नावावर दिले गेलेले परवाने व बाजार समितीच्या आवारातील महिलांचे अस्तित्व यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. लासलगाव बाजार समितीने तब्बल १७८ महिलांच्या नावे कागदी अाडतेे आणि खरेदीदारांचे परवाने दिले असताना, कारभाराच्या नाड्या मात्र पुरुषांच्याच हातात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झालेले आहे. त्यावर बाजार समिती व राज्य सरकार काय कार्यवाही करणार, असा प्रश्न आता होत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply