Take a fresh look at your lifestyle.

घर घेतानाच ‘तेही’ करण्याचा झालाय निर्णय; पहा पर्यावरण रक्षणासाठी राज्य सरकारने काय केलाय नियम

भोपाळ : आपले हक्काचे एखादे तरी घर असावे, असे कुणाला नाही वाटत. घर घेण्यासाठी जीवाचा किती आटापिटा करावा लागतो, हे त्या घर घेणाऱ्यालाच ठाऊक.. बँकेचे कर्ज घेऊन, वेळ प्रसंगी उसनवारी करुन घर घेण्यासाठी लोक पैसे जमा करतात. घराचे बांधकाम करायचे असेल तर आपल्या स्वप्नातील घरा सारखेच घर तयार करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. मग, यासाठी थोडे जास्त पैसे खर्च झाले तरी चालतील, असा विचार करणारीही मंडळी आहेत.. मात्र, आपल्या हक्काच्या घराला आकार देताना आपण कधी पर्यावरणाचा विचार करतो का, हा प्रश्न बहुधा कोणाच्याच डोक्यात येत नाही. तसेही हा प्रश्न उद्भवण्याचेही काहीच कारण नाही, असेच आपल्यालाही वाटत असेल ना.. पण, मध्य प्रदेश सरकारने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी घेतलेला निर्णय ऐकल्यानंतर मात्र ही गोष्ट आपल्याही लक्षात येईल.

Advertisement

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मध्य प्रदेश सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात कुठेही घर किंवा इमारतीचे बांधकाम करायचे असेल तर संबंधितांना आधी वृक्षारोपण करावे लागणार आहे. आता तुम्ही म्हणाल, की घराचा आणि वृक्षारोपणाचा काय संबंध ?  या प्रश्नाचेही उत्तर राज्य सरकारने दिले आहे. ज्यावेळी घर किंवा इमारतीचे बांधकाम केले जात असते त्यावेळी त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. पर्यावरणाची हानी होती. त्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान भरुन काढण्यासाठी वृक्षारोपण करणे बंधनकारक केले आहे, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. हा निर्णय फक्त खासगी घरे व इमारतींच्या बांधकामासाठीच नाही तर सराकारी योजनांतर्गत केल्या जाणाऱ्या घरांसाठीही बंधनकारक राहणार आहे.

Advertisement

आपल्या घराच्या आसपासच्या जागेत किंवा नगर पालिकांच्या पार्कमध्ये वृक्षारोपण करण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. तसे पाहिले तर, घर, इमारत किंवा मोठ्या रस्त्यांचे बांधकाम करायचे असेल तर अनेकदा मोठी झाडे आडवी येतात. त्यावेळी ही झाडे हटवण्या व्यतिरिक्त पर्याय नसतो. महामार्गांच्या बांधकामासाठी तर एकाच वेळी शेकडो झाडे तोडली जातात, हे तर माहिती आहेच. घर किंवा इमारतीचे बांधकामावेळीही कधीतरी अशा अडचणी येतात. पर्यावरणाचे नुकसान होते. या गोष्टी लक्षात आल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. निर्णय चांगला असला तरी आपले भारतीय लोक आणि सरकारी यंत्रणांचा स्वभाव पाहता या निर्णयाची अंमलबजावणी होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply