Take a fresh look at your lifestyle.

मत्स्यशेती करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पहा काय झालेत मत्स्यबीज विक्रीचे सुधारित दर

मुंबई : भूजलाशयीन क्षेत्रात मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच परराज्यातून होणारी आयात कमी व्हावी व राज्यात उत्पादित होणाऱ्या मत्स्यबीजांची जास्तीत जास्त विक्री होण्याच्या उद्देशाने राज्यातील शासकीय मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन केंद्रातून उत्पादित होणाऱ्या मत्स्यबीज विक्रीचे दर सुधारित करण्यात आले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.

Advertisement

भुजलाशयीन क्षेत्रामध्ये मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी मत्स्यशेतकरी, मत्स्य संवर्धक व मत्स्य कात्स्यकार यांना उत्तम प्रतीचे मत्स्यबीज पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने 32 मत्स्यबीज उत्पादन केंद्र, 2 कोळंबी बीज उत्पादन केंद्र, 32 मत्स्यबीज संवर्धन केंद्र व 1 कोंळबी बीज संवर्धन केंद्र याप्रमाणे 67 केंद्रांची स्थापना केलेली आहे. सद्य:स्थितीत राज्याची एकूण मत्स्यबोटुकलीची मागणी सुमारे 114 कोटी आहे. परंतु मत्स्य बोटुकलीची राज्यात पुरेसे उत्पादन नसल्याने परराज्यातून मत्स्यबीज आयात केली जाते. परराज्यातून आयात होणारे हे मत्स्य बीज निकृष्ट दर्जाचे असल्याने मत्स्य उत्पादनात तफावत निर्माण  होत आहे. यामुळे तसेच शासकीय मत्स्य बीज उत्पादन व संवर्धन केंद्रातून विक्री वाढविण्यासाठी राज्य शासनाने काही मत्स्यबीजांचे दर कमी केले आहेत.

Advertisement
मत्स्यबीज विक्रीचे प्रजातीनुसार नवीन दर पुढीलप्रमाणे (कंसात जुने दर) :
प्रमुख कॉर्प : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमि) – १००० रु प्रति लक्ष (१५०० रु.), मत्स्यबीज (२०ते२५ मिमि)- १२५ रु प्रति हजार (२०० रु.), अर्ध बोटुकली (२५ते५० मिमि) – २५० रु (३०० रु.), बोटुकली (५० मिमीचे वर) – ५०० रु (६०० रु.).
मृगळ : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमि) – ८०० रु प्रति लक्ष (१५०० रु.), मत्स्यबीज (२०ते२५ मिमि)- १२५ रु प्रति हजार (२०० रु.), अर्ध बोटुकली (२५ते५० मिमि) – २५० रु (३०० रु.), बोटुकली (५० मिमीचे वर) – ५०० रु (५०० रु.).
रोहू : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमि) – ८०० रु प्रति लक्ष (१५०० रु.), मत्स्यबीज (२० ते २५ मिमि)- १२५ रु प्रति हजार (२०० रु.), अर्ध बोटुकली (२५ ते ५० मिमि) – २५० रु (३०० रु.), बोटुकली (५० मिमी चे वर) – ५०० रु (५०० रु.).
कटला: मत्स्य जिरे (८ ते १२ मिमि) – १००० रु प्रति लक्ष (१६०० रु.), मत्स्यबीज (२०ते२५ मिमि)- १५० रु प्रति हजार ( २५० रु.), अर्ध बोटुकली (२५ते५० मिमि) – ३५० रु (३५० रु.), बोटुकली (५० मिमी चे वर) – ६०० रु (६०० रु.).
गवत्या/चंदेऱ्या : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमि) – १००० रु प्रति लक्ष (१६०० रु.), मत्स्यबीज (२० ते २५ मिमि)- १५० रु प्रति हजार ( २५० रु.), अर्ध बोटुकली (२५ ते ५० मिमि) – ३५० रु (३५० रु.), बोटुकली (५० मिमीचे वर) – ६०० रु (६०० रु.)
सायप्रिनस : मत्स्य जिरे (८ ते १२ मिमि) – १००० रु प्रति लक्ष (१६०० रु.), मत्स्यबीज (२० ते २५ मिमि)- १५० रु प्रति हजार ( २५० रु.), अर्ध बोटुकली (२५ ते ५० मिमि) – ३५० रु (३५० रु.), बोटुकली (५० मिमी चे वर) – ६०० रु (६०० रु.).
पंगेशियस ( मत्स्यजिरे) (लाखात) : ९-२० मिमि – ४००, २१-३५ मिमि – ८००, ३६-५० मिमि – ८००, ५१-८० मिमि – २०००, ८१-१२० मिमि – ३०००.
गिफ्ट तिलापिया प्रजाती ( मत्स्यजिरे) (लाखात) : ९-२० मिमि – १०००, २१-३५ मिमि – २०००, ३६-५० मिमि – ३०००, ५१-८० मिमि – ४५००, ८१-१२० मिमि – ७०००.

   

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply