Take a fresh look at your lifestyle.

क्रेडीट घेण्यासह मोदी सरकारने फ़क़्त ‘हेच’ केले; पहा डॉ. अमर्त्य सेन यांनी नेमके काय म्हटलेय

दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात उडालेला हाहाकार अवघ्या जगाने पाहिला. पहिल्या लाटेचा देशाने यशस्वी सामना केला, सरकारलाही शाबासकी मिळाली. मात्र, दुसऱ्या लाटेत अगदीच गाफील राहिल्याने कोरोनाने देशात अक्षरशः थैमान घातले. कोट्यावधी लोक या घातक विषाणूच्या विळख्यात सापडले. लाखो लोकांचे प्राण गेले. ऑक्सिजनसाठी जीवाचा आटापिटा करावा लागला, अशा अगदीच भीषण संकटाला तोंड द्यावे लागले.

Advertisement

या परिस्थितीस केंद्र सरकारचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनीही केंद्र सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनीही केंद्र सरकारच्या कोरोना काळातील कामकाजावर जोरदार टीका केली आहे. सेन यांनी सरकारवर टीका करताना म्हटले, की ‘केंद्र सरकारने कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण केलेल्या कामांचे श्रेय घेण्यावर लक्ष केंद्रीत केले. आपल्याकडे औषध निर्माण करण्याचे कौशल्य आणि रोग प्रतिकारक क्षमता या जमेच्या बाजू असल्याने देश महामारीचा मुकाबला करण्यासाठी मजबूत स्थितीत होता. मात्र, अशा वेळी सरकार वेगळ्याच भ्रमात राहिले. याचा परिणाम असा झाला की, देशात क्षमता असतानाही संकटाचा मुकाबला आपण करू शकलो नाही.’

Advertisement

‘देशात कोरोना महामारी फैलावणार नाही याचे नियोजन करणे महत्वाचे होते. मात्र, या महत्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत केंद्र सरकार फक्त कामांचे श्रेय घेण्यातच आघाडीवर होते. देश आधीच अनेक संकटांचा सामना करत होता, त्यात आता या महामारीने संकटात आणखी वाढ केली आहे. अर्थव्यवस्थेचे अपयश आणि सामाजिक एकोप्याचा अभाव या कारणांमुळे सुद्धा आपण महामारीचा मुकाबला करण्यात अपयशी ठरलो,’ असे सेन यांनी सांगितले. दरम्यान, देशात आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. राज्यांतील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यांनी निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे लसीकरणाने मात्र अजूनही वेग घेतलेला नाही. राज्यांच्या लसींच्या तक्रारी कायम आहेत. लसी मिळत नसल्यानेच लसीकरणास वेग येत नाही. आतापर्यंत २३ कोटी नागरिकांनाच लस देणे शक्य झाले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply