Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईवर केंद्र सरकारने म्हटलेय ‘असे’; पहा नेमके काय कारण दिलेय PMO कार्यालयाने

दिल्ली : कोरोना विषाणूस रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता लसीकरणावर भर दिला आहे. केंद्र सरकार देशातील लसीकरणाचे नियोजन करत आहे. देशातील लसीकरणाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली.

Advertisement

पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील लसीकरणा बरोबरच किती लसींचे नुकसान झाले, याचीही माहिती घेतली. कोरोना लसी वाया जाण्याचे प्रमाण अजूनही जास्त आहे. लसींचे नुकसान टाळण्यासाठी राज्यांनी योग्य निर्णय घ्यावेत, असे मोदी यांनी सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी कोरोना लसींची उपलब्धता तसेच लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी काय नियोजन केले आहे, याची माहिती दिली. देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत जवळपास २३ कोटी नागरिकांना लस दिली आहे. असे असले तरी लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. याचे कारण म्हणजे, कोरोना लसींची कमतरता. केंद्र सरकार पुरेशा लसी देत नाही, लसीकरणाचे नियोजन फसले आहे, अशी टीका विरोधी पक्ष सातत्याने करत आहे. कोर्टानेही अनेकदा सरकारला फटकारले आहे. मात्र, तरीही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

Advertisement

आजही राज्यांना पुरेशा प्रमाणात लसी मिळत नाहीत. लसी नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहे. लस तयार होऊन आठ महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. तरी सुद्धा या काळात फक्त २३ कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. देशाची लोकसंख्या पाहता हा आकडा खूपच कमी आहे. आता तर तिसरी लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या लाटेचा प्रसार रोखायचा असेल तर आताच जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. मात्र, ज्यावेळी लसीकरण वेगाने होणे आवश्यक आहे. त्याचवेळी लसींची कमतरता आहे. आणि त्यामुळे लसीकरणाचा वेग सुद्धा कमी झाला आहे. विरोधक सुद्धा या मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. काँग्रेस तर सातत्याने टीका करत आहे. सरकारवर मात्र त्याचा परिणाम होताना दिसत नाही. राज्ये आमच्याकडे लसी नसल्याचे सांगत आहेत. केंद्र सरकार मात्र राज्यांकडे जवळपास दोन कोटी लसी शिल्लक असल्याचा दावा करत आहेत. तर दुसरीकडे राज्ये मोठ्या प्रमाणात लसी वाया घालवत असल्याचेही म्हणत आहे. दोघांकडूनही असे परस्पर विरोधी दावे केले जात असल्याने लसीकरणातील गोंधळ मात्र चांगलाच वाढल्याचे दिसत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply