Take a fresh look at your lifestyle.

अखेर ‘त्या’ सिंहाचा झालाय मृत्यू; पहा नेमके कशाने आरोग्य बिघडले त्याचे

हैदराबाद : जगभरात कोरोना विषाणून नुसता उच्छाद मांडला आहे. या विषाणूने लाखो लोकांचे प्राण घेतले आहेत. आता तर माणसेच काय पण, हा घातक विषाणू आता प्राण्यांना सुद्धा विळख्यात घेऊ लागला आहे. पाळीव प्राणी कोरोना बाधित झाल्याच्या बातम्या याआधी आल्या होत्या. एवढेच काय रशियाने तर प्राण्यांसाठी सुद्धा कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचेही आपण ऐकले. आता मात्र, आपल्या देशातच अशा धक्कादायक घटना घडू लागल्या आहेत. तामिळनाडू राज्यातील अरिगनर अण्णा प्राणी संग्रहालयातील काही सिंह कोरोना संक्रमित आढळले होते. यातील एका सिंहाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.

Advertisement

या प्राणी संग्रहालयातील एकूण ९ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर लगेच उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी सायंकाळी यातील एका सिंहाचा मृत्यू झाला. याआधी मे महिन्यात पशुवैद्यकीय पथकाला प्राण्यांची देखभाल करताना सिंहांना भूक न लागणे, नाकातून पाणी येणे, कफ यांसारख्या समस्या जाणवत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर या सिंहांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणी अहवाल आल्यानंतर नऊ सिंह कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या सिंहांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी यातील एका सिंहाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

Advertisement

प्राण्यांना कोरोनाने संक्रमित केल्याची फार प्रकरणे नाहीत. मात्र, हा विषाणू प्राण्यांनाही संक्रमित करू शकतो, हे आता स्पष्ट झाले आहे. विदेशात काही ठिकाणी पाळीव प्राणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. तोपर्यंत भारतात मात्र अशी घटना घडली नव्हती. त्यानंतर मात्र भारतातही सिंह कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले. देशातील ही बहुधा पहिलीच घटना असावी. त्यामुळे सहाजिकच भितीचे वातावरण तयार झाले. कोरोना हा फक्त माणसांचाच आजार आहे, असे जे म्हटले जात होते, ते देखील या घटनेने खोटे असल्याचे सिद्ध केले. दरम्यान, देशात आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply